Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 17
________________ मानव धर्म नाही' तोपर्यंत मनुष्यपणा राहणार. स्वत:चे हक्काचे भोगेल, त्यास मनुष्य जन्म मिळेल, बिनहक्काचे भोगेल तो जनावर गतित जाईल. स्वत:च्या हक्काचे दुसऱ्याला द्याल तर देवगति मिळेल आणि मारून बिनहक्काचे घ्याल तर नर्कगति मिळेल. ___ मानवतेचा अर्थ मानवता म्हणजे 'जे माझे आहे ते मी भोगेल आणि जे तुझे आहे त्यास तू भोग' जे माझ्या हिस्यात आले ते माझे आणि जे तुझ्या हिस्यात आले ते तुझे. परकी वस्तूवर नजर ठेवू नये, हा मानवतेचा अर्थ आहे. मग पाशवता म्हणजे 'माझे ते माझेच आणि जे तुझे ते पण माझे!' आणि दैवीगुण कशाला म्हणणार? 'जे तुझे ते तुझेच आणि जे माझे आहे ते पण तुझेच.' जे परोपकारी असतात ते स्वतःचे असेल, ते पण दुसऱ्यांना देऊन टाकतात. असे दैवीगुणवाले सुद्धा असतात की नाही? आजकाल तुम्हाला अशी मानवता दिसून येते का कुठे ? प्रश्नकर्ता : काही ठिकाणी पहायला मिळते आणि काही ठिकाणी पहायला नाही सुद्धा मिळत. दादाश्री : एखाद्या माणसात पाशवता पहायला मिळते का? जेव्हा तो शिंगे फिरवतो तेव्हा आपण नाही का समजणार की हा रेड्यासारखा आहे, म्हणूनच शिंगे मारायला येतो! त्यावेळी आपण बाजूला सरकले पाहिजे. अशी पशुतावाला मनुष्य तर राजासही सोडत नाही! समोरुन जर राजा येत असेल तरी पण म्हशीचा भाऊ तर मस्तीत चालत राहतो, तेथे राजाला सुद्धा वळून बाजूला व्हावे लागते पण तो काही बाजूला होत नाही. हा आहे मानवतेपेक्षाही मोठा गुण यानंतर मानवतेपेक्षाही वरचढ, असे 'सुपर ह्यमन' (दैवी मानव) कोणास म्हणणार? तुम्ही दहा वेळा एखाद्या व्यक्तिचे नुकसान केले, तरीसुद्धा जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळेस ती व्यक्ति तुमची मदत

Loading...

Page Navigation
1 ... 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42