Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 35
________________ 26 मानव धर्म मानव धर्म तर सेफसाइड(सलामती)च दाखवतो. प्रश्नकर्ता : ही गोष्ट खरी आहे की, आपण दया दाखवतो त्यामुळे समोरच्याच्या मनात एक अशाप्रकारची भावना उद्भवते की तो दुसऱ्यांवर अवलंबून जगत आहे. दादाश्री : त्याला खायला-प्यायला मिळाले की मग तो कोणी दारू ठेवत असेल तेथे जाऊन बसतो, आणि खाऊन, पिऊन मजा करतो. प्रश्नकर्ता : दादा, तुमचे खरे आहे, तो पितो. याचा उपयोग अशाप्रकारे होत असतो. दादाश्री : असेच असेल, तर आपण त्यांना बिघडवू नये. आपण कोणाला सुधारु शकत नाही, तर त्याला बिघडवायचेही नाही. ते कसे? तर ते सेवा करणारे दुसऱ्या लोकांकडून कपडे घेऊन ह्या लोकांना देतात परंतु हेच लोक ते कपडे विकून भांडी घेतात. त्या ऐवजी ह्या लोकांना काम-धंद्याला लावावे. अशाप्रकारे कपडे देणे, खाण्याचे देणे हा मानव धर्म नाही. त्यांना काम-धंद्याला चढवावे. प्रश्नकर्ता : तुम्ही सांगतात त्या गोष्टी तर सर्वच स्वीकारतात आणि तिथे तर ते फक्त दान देऊन पंगु बनवतात. दादाश्री : त्यामुळेच हा सर्व पंगुपणा आलेला आहे. इतके अधिक दयाळु लोक, पण अशी दया करण्याची गरज नाही. त्याला एक हातगाडी विकत घेऊन द्या आणि भाजी-पाला द्या. पहिल्या दिवशी विकून येईल, दुसऱ्या दिवशी विकून येईल. त्याचा रोजगार सुरु झाला. असे पुष्कळ मार्ग आहेत. मानवधर्माची निशाणी प्रश्नकर्ता : आम्ही आमच्या मित्रांसोबत दादांची ही गोष्ट बोलतो, तेव्हा ते म्हणतात की 'आम्ही मानव धर्म पाळतो एवढे पुरेसे आहे,' असे बोलून ही गोष्ट टाळतात.

Loading...

Page Navigation
1 ... 33 34 35 36 37 38 39 40 41 42