Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 28
________________ मानव धर्म मुंबईत असताना, तेथे एक माणूस इतका घाबरट होता, तो मला म्हणाला, 'आजकल तर ह्या टॅक्स्यांमधून फिरायलाच नको.' मी विचारले, काय झाले, भाऊ? एवढ्या दहा हजार टॅक्स्या आहेत तरी फिरु शकत नाही. असे ना फिरायला काय झाले? तसा काही सरकारी कायदा निघाला आहे का? तेव्हा सांगतो, 'नाही, लुटतात. टॅक्सीत मारून-ठोकून लुटतात.' अरे मुर्खा, असे वेड्यासारखे तर्क कुठपर्यंत काढणार तुम्ही लोक?' लुटणे हे नियमानुसार आहे की नियमाच्या बाहेर आहे ? रोज चार जण लुटले जातात, त्यावरून हे बक्षिस तुला लागणार आहे, अशी खात्री कशावरुन पटली? बक्षिस तर कोणी हिशोब असलेल्याला कधीतरी लागते, बक्षिश रोज थोडी लागते? हे क्रिश्चन पण पुनर्जन्म समजत नाहीत. तुम्ही त्यांना कितीही विचारा की तुम्ही पुनर्जन्माला का समजत नाही? तरीही ते ऐकत नाहीत. परंतु आम्ही (ही त्यांची चूक आहे) असे बोलू शकत नाही, कारण हे मानवधर्माच्या विरुद्ध आहे. काही बोलल्यामुळे जर समोरच्याला जरा सुद्धा दुःख होत असेल, तर ते मानवधर्माच्या विरुद्ध आहे. तुम्ही त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. असे चुकलो मानव धर्म मानव धर्म मुख्य वस्तू आहे. मानव धर्म एक समान नाहीत. कारण की मानव धर्म ज्यास 'करणी' (कृत्य) असे म्हटले जाते आणि ह्या कारणाने जर एखादा युरोपीयन तुमच्याशी मानव धर्म बजावेल व तुम्हीही त्याच्याशी मानव धर्म बजावाल तर दोन्हींमध्ये खूपच फरक असेल. कारण त्यामागे त्याची भावना काय? आणि तुमची भावना काय? कारण की तुम्ही डेवलप आहात, अध्यात्म ज्या देशात 'डेवलप' (विकसित)झालेले आहे, त्या देशाचे तुम्ही आहात. त्यामुळे आपले संस्कार खूपच उच्च कोटिचे आहेत. जर मानवधर्मात आलेला असेल, तर आपले संस्कार तर एवढे उच्च कोटीचे आहेत की त्या संस्कारांना काही सीमाच नाही, परंतु लोभ व लालचमुळे हे लोक मानव धर्म चुकले आहेत. आपल्या येथे

Loading...

Page Navigation
1 ... 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42