Book Title: Ardhamagdhi Vyakaran
Author(s): K V Apte
Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra

View full book text
Previous | Next

Page 431
________________ ४३० अर्धमागधी व्याकरण प्राणी सुखाची इच्छा करतात, दुःखाची नाही. २) नियपक्खबलेणं चिय पडइ पयंगो पइवंगि। (पाकमा पृ. २०) स्वतःच्या पंखाच्या बळानेच पतंग दिव्यावर पडतो (झडप घालतो). इ) १) सोक्खं न होइ कस्स वि निरंतर एत्थ संसारे। (वज्जा १९३) या संसारात कुणालाही कायमचे सुख मिळत नाही. २) कोहो पीइ पणासेइ। (दस ८.३८) क्रोध प्रीति नष्ट करतो. ४) कथनात भूतकाळार्थी वर्तमानकाळाचा उपयोग होतो. १) रायगिहे नयरे सुदंसणो नाम गाहावई परिवसइ। (निरमा पृ. ६४) रायगिह नगरात सुदंसण नावाचा गृहस्थ रहात होता. २) जाब पुराओ बाहि निद्दच्छइ नरवरो सपरिवारो। (सिरि १११) जेव्हा राजा परिवारासह नगराबाहेर पडला. अ) अपूर्ण वा रीति भूतकाळ दर्शविण्यासहि वर्तमानकाळाचा उपयोग होतो. १) दिवसे कीलइ पमयाजणेण। (सुपास ४९२) दिवसां स्त्रियांशी खेळी २) पश्वरिस सो गच्छइ उज्जेणिनिवस्स सेवाए। (सिरि ७९) प्रतिवर्षी तो उज्जेणीच्या राजाच्या सेवेस जात असे. ५) भविष्यकालीन क्रिया दाखविण्यासहि वर्तमानकाळाचा उपयोग होतो. अ) विचार वा इच्छा गर्भित असतां प्रश्नार्थक सर्वनामा बरोबर वर्तमानाचा उपयोग भविष्यार्थी होतो. उदा. १) किं. करेमि कत्थ गच्छामि। (चउ पृ. १८) काय करावे? कोठे जावे? २) को तुह सासणं अइक्कमइ। (महा पृ. १६५ अ) तुझी आज्ञा कोण उल्लंघील? आ) संदर्भाने : १) वच्च तुमं एस आगच्छामि। (समरा पृ. ५१७) जा तू हा मी येतोच (येईन) २) मोत्तूण इमं ठाणं देसंतर वच्चामि। (महा पृ. २४ अ) हे स्थान सोडून देशांतरी जाईन. इ) भविष्यकालीन संकेत वाक्यातही वर्तमानाचा उपयोग आढळतो. १) जइ अस्थि मज्झ पुन्न ता होही निगुणो वि गुणी। (सिरि १०६) जर माझे पुण्य असेल तर गुणरहित सुद्धा गुणी होईल. २) ह धणवंत जइ कमवि गंतु मग्गोसि सो वि धुवं एयं कज्ज पसाहइस्सइ। (महा पृ. १५९ ब) जर कोणा श्रीमंताकडे जाऊन मागशील तर तो सुध्दा तुझे हे कार्य खरोखर सिद्धीला नेईल.

Loading...

Page Navigation
1 ... 429 430 431 432 433 434 435 436 437 438 439 440 441 442 443 444 445 446 447 448 449 450 451 452 453 454 455 456 457 458 459 460 461 462 463 464 465 466 467 468 469 470 471 472 473 474 475 476 477 478 479 480 481 482 483 484 485 486 487 488 489 490 491 492 493 494 495 496 497 498 499 500 501 502 503 504 505 506 507 508 509 510 511 512 513