________________
४५०
अर्धमागधी व्याकरण
(विवाग पृ. २८) अभग्गसेण चोरसेनापतीला जिवंत पकडतात.
५) ल्यबन्ताचा कधी तुमन्ताप्रमाणे उपयोग केला जातो.
१) इंदो अहिसिंचिऊण आढत्तो। (पउम. ३.९४) इंद्राने अभिषेक करण्यास सुरुवात केली. २) न हु सी पभू तुमं पुत्ता सामण्णमणुलिया। (उत्त १९.३४) पुत्रा, श्रामण्याचे पालन करण्यास तू खरोखर समर्थ नाहीस ३) चिंतेऊण पवत्तो। (पउम. २.१०४) विचार करू लागला.
६) कधी कधी 'सुद्धा' या अर्थी असंगति दर्शविण्यास ल्यबन्ताचा उपयोग केलेला आढळतो.
१) तुमं विजाहरो होऊण केण कारणेण भूमिगोयरधूयं उव्वोदमिच्छसि। (महा पृ. ६० अ) तू विद्याधर असूनहि काय कारणाने पृथ्वीवरील मुलीशी लग्न करण्याची इच्छा करतोस? २) जो होइ दुट्ठचित्तो एयस्साराहगो वि होऊण। तस्स न सिज्झइ एयं। (सिरि २१४) याचा आराधक असूनहि जो दुष्टचित्त होतो, त्याच्या बाबातीत हे सिद्ध होत नाही.
७) कर्मण्यर्थी : कर्मणि प्रयोगात कर्तृपद तृतीयेत गेले तरी त्याशी संबंधित असणारे ल्यबंत तसेच रहाते.
१) अग्गओ गंतूण भणियं तीए। (नल. पृ. ३) पुढे जाऊन तिने म्हटले ३) हसिऊण तेहिं भणियं। (नल. पृ. ४२) त्यांनी हसून म्हटले ३) भीमेणावि नलो नाऊण निवेसिओ, नियसिंहासणे। (नल. पृ. ३४) भीमाने सुद्धा ओळखून नळाला आपल्या सिंहासनावर बसविले
८) 'इति' पुढे येऊन 'कर' च्या ल्यबन्ताचा एक विशिष्ट वाक्यांश होतो. त्ति (ति) किच्चा, ति (ति) कट्ठ.
९) क्रियापदापुढे त्याचेच ल्यबन्त लगेच येऊन अर्धमागधी आगमात एक विशिष्ट वाक्प्रयोग होतो. (यावेळी पुष्कळदा क्रियापदापुढे २ हा अंक असतो.)
१) पयाहिणं करेइ २ ता वंदइ। (उवा. परि. १०) प्रदक्षिणा करतो. प्रदक्षिणा करून वंदन करतो. २) जेट्ठ पुत्तं सद्दावेइ २ त्ता एवं वयासी। (उवा. परि. ६६) ज्येष्ठपुत्राला बोलावतो. त्याला बोलावून असे म्हणतो.