Book Title: Ardhamagdhi Vyakaran
Author(s): K V Apte
Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra

View full book text
Previous | Next

Page 488
________________ प्रकरण ३० : वाक्यातील शब्दक्रम व वाक्यक्रम ४८७ (पाकमा. पृ.७०) तू असे म्हणावेस - महाराज, इंद्र तुमची वार्ता विचारत आहे. ' (२) भांति धीवरा वि एवं अम्हं वित्ती परिकप्पिया पयावइणा, नत्थि अम्हाण दोसो। (कथा. पृ.१३६) धीवर सुध्दा असे म्हणतात प्रजापतीने आमची वृत्ति ठरवली आहे; आमचा दोष नाही. (४) 'जं' ने सुरु होणारे वाक्य प्रायः नंतर असते. अहो सुंदरं जायं जं मे जणओ पव्वइओ । (धर्मो . पृ. १५३) माझा पिता संन्यासी झाला, हे चांगले झाले. (५) जत्थ, जत्थ-जत्थ ने आरंभ होणारी वाक्ये प्रथम असतात. (१) जत्थ य सागरे मिलिया गंगा तत्थ गंगासागरतित्थं जायं । (पाकमा. पृ.२८) जेथे गंगा सागराला मिळाली तेथे गांगासागरतीर्थ झाले. (२) जत्थ जत्थ वच्चामि तत्थ तत्थ एयाई आणेयव्वाइं । (समरा. पृ. २६५) जेथे जेथे मी जाईन तेथे तेथे ही आणावीत. (अ) जोर देण्यास ही वाक्ये कधी नंतर ठेवली जातात. तत्थ वच्चामि जत्थ न कोइ जाणइ । (धर्मो. पृ. २१७) जेथे कोणी ओळखणार नाही तेथे मी जाईन. (६) 'जया' नें प्रारंभी होणारे वाक्य प्रथम असते. (१) जया महावीरो इहं आगच्छेज्जा तया ममं एयमढं निवेदिज्जासि । (ओव. पृ.१४) जेव्हा महावीर येथे येईल तेव्हा ती गोष्ट मला सांग. (२) जया अवरज्झिही तया अणुसासिस्सामि । ( कथा. पृ. १०७) जेव्हा अपराध करील तेव्हा मी शिक्षा करीन. (अ) जोर देण्यास 'जया' चे वाक्य कधी नंतर ठेवतात. (१) जाणिहिसि एवमुल्लवंती जाहे रायकुले ढोइज्जसि । (कथा. पृ.१०८) असे बोलणाऱ्या तुला जेव्हा राजदरबारात नेले जाईल तेव्हा तुला कळेल (२) कहिस्सामो जया तुमं सपसाया भविस्ससि । (धर्मो. पृ.३४) जेव्हा तू प्रसन्न होशील तेव्हा सांगीन. (७) 'जाव' ने आरंभ होणारी वाक्ये प्रथम असतात. एवं च जाव... चिट्ठति ताव आगया उज्जाणवाली पल्लविया। (समरा.पृ.७०) अशा प्रकारे ज्यावेळी होते त्यावेळी उद्यानपालिका पल्लविया आली.

Loading...

Page Navigation
1 ... 486 487 488 489 490 491 492 493 494 495 496 497 498 499 500 501 502 503 504 505 506 507 508 509 510 511 512 513