________________
चमत्कार कोण शोधतो? शोधण्याची गरज कोणाला? ज्याला या संसारातील भौतिक सुखांची कामना आहे, मग ती स्थूल स्वरुपाची किंवा सूक्ष्म स्वरुपाची असू शकते. आणि ज्याला भौतिक सुखापलीकडील असे आत्मसुख प्राप्त करण्याचीच एकमेव कामना आहे, त्याला आत्मसुखापलीकडील चमत्काराची काय गरज? अध्यात्म जगात सुद्धा जिथे अंतिम लक्षापर्यंत पोहोचायचे आहे आणि ते म्हणजे 'मी कोण
आहे' याची ओळख करून घेण्याची, आत्म तत्त्वाची ओळख करून निरंतर आत्मसुखात मग्न रहायचे आहे, तिथे या अनात्म विभागाच्या लुभावणाऱ्या चमत्कारांत अडकून राहण्यास कुठे स्थान आहे?
मूळ पुरुषांची मूळ गोष्ट तर बाजूलाच राहिली पण त्यांच्या कथा ऐकत राहिले, गात राहिले आणि त्यातून जीवनात काही अंगिकारले नाही आणि ज्ञानाच्या भागाला तर जमिनीतच दाबून टाकले! या मूळ पुरुषांच्या मूळ गोष्टीला प्रकाशात आणून चमत्कार संबंधीच्या अज्ञान मान्यतांना 'दादाश्रींनी' झटकून टाकल्या आहेत. चमत्कारासंबंधी खरी समज दादाश्रींनी खूप कडक वाणीत प्रस्तुत केली आहे. वाचक वर्गाने त्या मागील आशय समजून घ्यावा अशी विनंती.
- डॉ. नीरूबहन अमीन
10