________________
आजकाल धर्मात खूप चमत्कार पाहायला मिळतात, ज्या प्रमाणे देवीचा वारा येतो, कुंकू पडते, हवेतून अंगारा येतो, वस्तू येतात, वगैरे वगैरे. आपले लोक यापासून खूप प्रभावित सुद्धा होतात. थोड्या वेळेसाठी अंतःकरण तिथे स्तंभित होऊन जाते आणि सारे दुःख विस्मृत होऊन आशेचा एक नवीन किरण प्रकटतो की, 'हो... आता माझी सगळी दुःखं मिटतील. देवी-देवतांची कृपा झाली !' पण थोड्या वेळानंतर पाहिले तर सर्वकाही पूर्ववत, जसेच्या तसे! एकही चिंता कमी झालेली नसते, थोडी सुद्धा आंतरिक शांती लाभलेली नसते ! फक्त रवंथ करण्या इतकीच ती गोष्ट! हो, लोकांना तेवढ्या वेळेसाठी धर्मात पकडून ठेवते, इतकाच फायदा स्वीकार्य आहे.
निरनिराळ्या प्रकारच्या कौटुंबिक, सामाजिक किंवा व्यक्तिगत उपाधिमध्ये चारही बाजूंनी घेरले गेलेले, तरी सुद्धा शांतीने जगण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांसाठी गरज आहे, त्यांना दाहकतेपासून गारव्याकडे घेऊन जाण्याची, अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याची, नाही की थोड्याफार उजेडाचाही घोर अंधकार करण्याची !
आध्यात्माच्या खऱ्या मार्गावर जाणारे, नराचे नारायण पद प्राप्त करणाऱ्या वर्गातील मूळ पुरुषांनी कधीही कोणताही चमत्कार केला नाही, आणि कधीही चमत्काराला महत्त्व दिले नाही. त्यानंतरचे संत, भक्त सामान्य रितीने समजू शकू अशा गोष्टींना सुद्धा ऐक्झागरेट करून (आहे त्यापेक्षाजास्त करून) चमत्कारात खपवतात. भक्तिवेडे भक्त भगवंतांला काहीही म्हणतात. त्यांच्या बाबतीत तेही स्वीकार्य आहे. पण आज आपण सुशिक्षित समजदार लोकांनी इतका विचार तर केलाच पाहिजे की, या चमत्काराचा आश्रय घेऊन शेवटी आपण काय मिळविले? कृष्ण, राम किंवा महावीरांनी कोणतेही चमत्कार केले नव्हते आणि त्या बाजूस लोकांना भ्रमित पण केले नव्हते. स्वतःचे जीवन ते आदर्शपणे जगून गेले. जे आज लोकांना कथानुयोगाच्या रुपात उपयोगी होत आहे आणि दुसरीकडे त्यांनी आध्यात्माची अचीवमेन्ट ( प्राप्ती) केली की जी लोकांना ज्ञान प्राप्तीचा मार्ग दाखविते. थोडक्यात, आत्म्याला जाणून मोक्षातच जाण्याची ज्ञानवाणी प्रतिबोध करते.