________________
चमत्कार
चमत्कार कशास म्हणावे? प्रश्नकर्ता : आध्यात्मिक साधना करत असताना चमत्कारासारखी शक्ति येते, ही गोष्ट खरी आहे की खोटी?
दादाश्री : नाही. असे आहे, आधी या चमत्काराची डेफिनेशन (व्याख्या) समजून घ्या. हे जे नाणे आहे, ते 'सोन्याचे नाणे' आहे, तर त्याची डेफिनेशन पाहिजे की नाही? की डेफिनेशन नसेल तर चालेल? असेच एखादे तांब्याचे नाणे असेल आणि त्यावर सोन्याचे 'गीलेट' करून आणले तर तेही डेफिनेशन नाही का मागणार? नाणे तेवढेच आहे, सोन्या सारखेच दिसते, म्हणून काय सोनंच आहे असे सांगितले तर चालेल का? आता हे जे डेफिनेशनवाले सोन्याचे नाणे आहे, त्यासमोर जर गीलेटवाले नाणे वजनात ठेवले तर ते वजनात कमी भरते. कशामुळे कमी भरते? कारण सोने वजनात जास्त असते. म्हणून आपण सांगतो की हे दुसरे नाणे डेफिनेशनपूर्वकचे नाही. अशाच प्रकारे चमत्कार सुद्धा डेफिनेशनपूर्वक असले पाहिजे. पण चमत्कार कशास म्हणावे, ही डेफिनेशन या जगात तयार झाली नाही. म्हणून याची डेफिनेशन नाही असे तर म्हणू शकत नाही ना. प्रत्येक वस्तुची डेफिनेशन असते की नाही? तुम्हाला काय वाटते?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
दादाश्री : तर चमत्काराची डेफिनेशन तुम्ही सांगा. तुम्हाला डेफिनेशन काय वाटते? काय डेफिनेशन असायला हवी?
प्रश्नकर्ता : काहीही नवीन झाले आणि ती बुद्धिच्या बाहेरची गोष्ट असेल, तोच चमत्कार.