Book Title: Anandrushi Abhinandan Granth
Author(s): Vijaymuni Shastri, Devendramuni
Publisher: Maharashtra Sthanakwasi Jain Sangh Puna
View full book text
________________
- प्रा० अ० अस० मोरे, एम० ए० [प्राकृत विभाग प्रमुख, दयानन्द महाविद्यालय, सोलापुर]
जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य
त्यांचे प्रमुख ग्रन्थ
% 3
Ala
जैन साहित्य अती विशाल आणि महान आहे । भारतीय साहित्यात त्याचे एक विशिष्ट स्थान असून, भारतीय साहित्याचे ते एक अविभाज्य अंग मानले जाते । जैन आचार्यांनी व साहित्यकारांनी विविध भाषांमधन ग्रंथरचना करून भारतीय साहित्याला विविधता प्राप्त करून दिली आहे व भारतीय साहित्य समृद्ध करण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न केले आहेत । जैन धर्माच्या इतिहासाचे अवलोकन केले तर, जैन धर्माने भारतीय समाज जीवन विकसित व सुदृढ़ करण्यास किती मदत केली आहे हे सहजपणे लक्षात येईल । शिवाय या धर्माने समाज जीवनाचा विचार संकुचित दृष्टिकोन ठेवून केलेला नाही । जैन धर्माचे कार्य एका राष्ट्रीय भमिकेतून झाल्यामुले त्यात सदैव उदार व उच्च विचारसरणीचा अवलंब केला गेला आहे । जैनाचार्या नी आपले बरेचसे जीवन साहित्य रचण्यातच व्यतीत केले आहे। त्यांनी आपल्या जैन दर्शन व तर्क शास्त्र, जैन तत्त्वविद्या आणि पौराणिक कथा, जैन सिद्धांत व नीतिशास्त्र तसेच अन्य साहित्यिक रचनांनी जैनधर्माचे यथार्थ दर्शन घडविले आहे। जैनधर्मात अनेक प्रकांड पंडित व विद्वान आचार्य झाले । त्यातील काही महान तार्किक, व्याकरणकार, तत्त्ववेत्ते व न्यायाचार्य होऊन गेले काही आचार्यांनी काव्य, नाटक, कथा, टीका, शिल्प, मंत्रतंत्र, वास्तु, वैद्यक इत्यादी विषयांवर देखील पुष्कल साहित्य लिहिलेले आहे।
जर्मन विद्वान डॉ० विंटरनिटज यांच्या मते 'जैन साहित्य हे भारतीय भाषांच्या इतिहासाच्या दृष्टीने अती महत्वपूर्ण आहे।' धर्म प्रचारासाठी म्हणून जैनधर्माने तत्कालीन लोकभाषांचाच स्वीकार केला आहे । आज जे जैन साहित्य उपलब्ध आहे, ते भ० महावीरांच्या परंपरेशी संबंधित आहे । भ० महावीरांचे प्रथम गणधर गौतम इंद्रभूती होते । भ० महावीरांचा उपदेश लक्षात ठेऊन तो बारा अंग व चौदा पूर्वाच्या रूपाने विभागला । अंग व पूर्वांग ज्ञानात ते निपुण होते त्यांना श्रुतकेवली म्हटले जात असे । जैन परंपरेत 'केवलज्ञानी' व 'श्रुतकेवली' ही दोन पदे अत्यत महत्त्वाची मानली जात । 'केवलज्ञानी' समस्त चराचर
-AAAAAJAL
na
n danRJAJALAnnanAANAS
आचार्यप्रवर अभिआचार्यप्रवभिनी श्रीआनन्दग्रन्थ श्रीआनन्दन्थ
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org