SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 502
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग छत्तीसावा । ४७७ त्या कन्येचे पूर्वसुकृत । मुनिराय होते त्या वनात । उग्रसेन गेले दर्शनात । पंचांग नमोस्तु भावयुक्त । कन्या तेथे अवलोकिली ॥१२८॥ पृच्छा केली मुनिराया । भवांतर सांगीतल तया । इथे पालन करी सखया । जीवाची दया युक्तीसार ॥१२९॥ गृहास आला घेवोनी । ते पाहिली कंसनयनी । उपवर देखिली गजगामिनी । विचारी मनी लग्न करू ॥१३०॥ कुरूवंसी कन्या होय । यादवासी द्यावी निश्चय । विनवुनी वसुदेवराय । केला महोत्सव यथाविधी ॥१३१।। लग्न झाले कित्येका दिनी । पुष्पवंती झाली कामिनी। जीवंजसा रायभामिनी । उछाहजनी विधीयुक्त ॥१३२।। तत्समयी अतिमुक्ती । भाव आहारा गृहा येती। दीर म्हणोन विनोदती । हासोनी बोलली जीवंजसा ॥१३३॥ तुमची भगिनी पुत्रवती । तुम्ही कैसे जाला यती । तुम्हा न कळे संसारयुक्ती । संतत संपत कैचि तुम्हा ॥१३४॥ हास्य चेष्टा करी मुनीसी । अंतराय जाला भावरीसी । हे पापिनी काय वदसी । न जानसी तू पापपुण्य ।।१३५।। देवकीपुत्र उत्पन्न । तो करील कंसाच हनन । ऐकोन जाली क्रोधाग्न । दाखवी नैन रक्तवस्त्र ॥१३६॥ ते चुरले दोही करे । यति म्हणे होईल संहार । तव तीन फाडिल चीर । हास्याचा नीकुर जाहला ॥१३७॥ द्विधा केल त्वा वस्त्रासी । तेचि गती तव पित्यासी । असे ऐकताचि मानसी । गेली गृहासी अधोदृष्टी ॥१३८॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy