SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 503
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४७८ । आराधना कथाकीव मंदिरी आला कंसराय । अश्रुनयन का गे स्त्रिय । पृच्छा करितो सांग काय । मम हृदय तव प्रीती ॥ १३९ ॥ अतिमुक्ती मुनिवचन । सर्वं केले निरोपन | ऐकता रायाचे अंतःकरण । भयभीत मन जाहला ॥१४०॥ म्हणे स्वामिवचन सत्य । कां गे छेडिले त्वा तयात । विचार करोनी मनात । उपाय त्यात करीन मी पै ।। १४१ ॥ देहे लोभ धरोनी प्राणी । कूड कपट कधी मनी । यादवापासी जावोनी । वसुदेव धनी विनविला ।। १४२ ।। स्वामी मी तुमचा अंकिला | तुमचा उपकार मजला । तो न जायचि फिटला । ऐकावे बोला माझिया ॥ १४३ ॥ मम भगिनी रूपवंत । तुम्हा दिली वचन सत्य । यादवे मान्य केले समस्त । केला विधियुक्त विवाह || १४४ || कित्येक दिवसाउपरी । देवकी पुष्पवंती मंदिरी । कंस मोहोछाय करी । यादवा पाचारी समुदाये ॥ १४५ ॥ फळशोभन यथायुक्त । वस्त्रभूषण भावयुक्त । अवघे गेले स्वस्थळात । वसुदेवात विनविले ॥ १४६ ॥ तुम्ही येथेचि राहणे । मम मनोरथ पूर्ण करणे । मनात कपट धरोन । केले रक्षण वसुदेवा || १४७ || यादवाचे सरळ चित्त । देवगुरूसी वंदना नित्य । कंस कपट जाले श्रुत । गेले वनात स्वामीपासी ॥ १४८ ॥ वय प्रदक्षिणा देवोन पंचांग नमोस्तु त्रिकरण । उभयता कर जोडोन | केले श्रवण धर्मशास्त्र || १४९|| वसुदेव कर जोडोन । पृच्छा करी स्वामीकारण । ममोदरी पुत्र उत्पन्न । कंसहनन जरासंधा ॥ १५०॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy