SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 501
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४७६ : आराधना कथाकोष जीवंजसा कंस परनिलो । दासदासी आंदन दिली । आळिंकारादि वस्त्र केली । ग्राम दिधली देशादिक ॥११६॥ चतुरंग सेना घेवोन । ग्राम देश पाहे चक्षुन । पूर्व वैर संबधे करून । मथुरा उद्यान उतरले ।।११७|| उग्रसेन भेटीस बाहिला । न येता संग्रामासी आला । तेथे संग्राम फार जाला । जिवंत धरिला उग्रसेन ॥११८॥ महा कष्ट स्वतः पुत्र । उदरी जन्मोमी साधि वैर । कुळाचा करीतो संहार । जगी कुपुत्र पूर्ववैरी ॥११९।। सप्त दरवाजाचे वरे। पितृ बंधखान्यात त्वरे । चतुर्दिशी चौकी प्रहरे । सुभट शूर नग्नशस्त्री ॥१२०॥ लोह्याचा पिंजरा करोनीया । ठाव नसे त्यात फिराया । कांजि कण्या त्या खाया पिया । एके ठाया एकेचि वेळे ॥१२१॥ राज्य करी मथुरेचे । राजे भेटी येति देशाचे । क्रोधनेत्र पाहोनिया त्याचे । लोक ग्रामीचे भयाभीत ॥१२२॥ तदा कंसाचा लघुभ्राता । अतिमुक्ती महान् ज्ञाता । विपरीत पाहोनी भयाभीता । गेला वनातौत दीक्षा ग्रहे ।।१२३॥ तत् सद्भक्ती कंसरायान । मुनीसी नमोस्तु विधीन । प्रार्थना करी विनयान । समीप राहोन गुरूवर्या ॥१२४॥ राजा घातला बंधखानि । महादुःखी रेवती राणी । रयित प्रजा सर्व मिळोनी । अंतःकरणी दुःखी समस्त ।।१२५॥ असो दुसरे कथांतर । अमृतकावत्या ग्राम सुंदर । देवक राजा महाचतुर । राणी मनोहर धनदेवी ॥१२६॥ कन्या जन्मली देवकी बाळा । पंचवरुषाची वैल्हाळा । पूर्ववैरी हारिली बाळा । मथुरा जवळ वनवामी ॥१२७॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy