SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 446
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग बत्तीसावा | ४२१ आम्हा नेई पैलतीरासी । उत्तारा देऊ गे तुजसी । दुर्गंधा म्हणे बाबा बैसी । पैलतीरासी नेते त्वरा ॥८॥ नावेत बैसला ऋषीश्वर । कन्या देखिलि महासुंदर । मदनबाण अनिवार । कामातुर कुयोगी तोची ॥९॥ नयनबाण खडतरला । कामबाण हातचा निसटला । अजिंक्य न जाय जिंकीला । त्रिभुवनि जाला बलाढ्य ||१०|| इंद्र आणि बलाढ्य चंद्र । ब्रह्माविष्णु तो महारुद्र । कामबाणे केले जर्जर । व्यंतर किंन्नरनभचरादि ॥ ११॥ स्वर्गलोक जितनी त्वरे । मध्ये लोकि आला तो धरे । महान्महा ऋषीश्वर । कामे जर्जर भूमंडळी ॥१२॥ तेहेतीस कोड महाऋषी । कामबाणे जिंकिले त्यासी । पुराणिक हरदासासि । राजा राणिसी सुष्टदुष्टा ॥ १३॥ जितुनिया भूमंडळ । तेथोनि गेला सप्तपाताळ | नर्कवासिया कृष्णबाळे । दुःखी परि बळे जिंकीले ॥ १४ ॥ त्रैलोकि विजयी होवोनी । जीव भोगीति चार खानि । चौन्यांसि लक्ष भोग योनि । पापि प्राणि कामिलंपट || १५ ॥ एकेंद्री आदि पंचेद्रिय कामे जितिले महाज्ञानिय । मा पाराशराचा केवा काय । मत्स्योदसि होय लंपट || १६ || दुर्गंधेसि म्हणे हे कन्या । मम ईच्छा तूं करि पूर्ण । ढीवरि म्हणे मी जातिहीन | तुम्ही स्पर्शन करू नये ॥१७॥ विटाळ झाल्या गंगास्नान । क्रोध गाळि श्रापवचन | भयभीत मी अतःकरण | दुर्गंधहीन शरीर माझे || १८ || I १. मदनेन. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy