________________
प्रसंग एकोणतीसावा । ४.१ तद्दिनकर उगवला । नारीनर मेळा मिळाला।। आगई गई घात जाला । अजच आला दुसमान ॥७९॥ चूंचूंछींछू नारी वदती । आल्लल्ल भान्य रभोभाति । विद्रूप केली महासती । जावोनि सांगति रायासी ॥८०॥ नृपेंद्र म्हणे शूळी घाला । पापाचा भार फार झाला । .... .... .... । न्यायनीतीला कोन वाहे ।।८१॥ देवदत्तासी बांधियल । स्मशानात चालविले । सर्व लोक गहिवरले । विपरीत झाले लोकासी ॥८२॥ रत्नद्वीपस होता गेला । बारावरसा घरा आला। स्त्रियचा मेळा पंकजाला । देवदत्ताला पुसताती ॥८३॥ तो वेडावला चित्ती फार । काकुळत करितो थोर । मायबाप खाली नजर । करी आंतरी गहीवर ॥८४॥ तेव्हा चोर सहस्रभट । रायासन्मुख उभा धीट । देवा स्त्रियच हे कपट । चरित्र स्पष्ट म्या पाहिले ।।८५।। मीहि चोर आहे वो सत्य । याचि घेत होतो पाळत । याने धरोनि स्त्रीचि प्रीत । श्वशुरगृहात निजला ॥८६॥ हे रांड त्याचीच सोकली । रात्री शूळापासी गेली । प्रेतावर उभी राहिली । तोंड घाली त्याच्या तोंडात ॥८७॥ ओठपुडी तीच्या नाकाची । दातखीळ बैसली गची। पापबुधि स्त्रीचरित्राची । डालगीळी सत्यची होय ॥८८॥ मी होतो वटवृक्षातळी हाति धरली होती ढाळी । खड्ग मारित करांगुळी । छेदती चांडाळी हे पाहा ।।८९।।
ओठाची डाळीची ते खून । पाहून राजा वैराग्यमन । धिग् धिग् स्त्री चांडाळीण । धिक् जिन संसाराचे पै ॥९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org