SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 72
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र प्रदेश एकत्र आणून ठेवलेला आहे कीं काय असा दिसतो. या देशांतील अरण्य शुभ गायींच्या खिल्लारांनी व मनसोक्त विचरणाऱ्या हरिणांनी गजबजलेले असून लहान मुलांनाहि न भिववितां रात्री आनंद देणा-या चंद्रबिंबाप्रमाणेंच तो अरण्यभाग दिसतो. अर्थात हिंस्र जनावरें विदेहदेशाच्या अरण्यांत नव्हती. खलता लोकांमध्ये मुळींच नसून ती शेतांत मात्र धान्याच्या खळ्याच्या रूपाने होती; कुटिलता समाजांत मुळींच नसून सुंदर स्त्रियांमध्ये तेवढी ती होती; मधुप्रलाप फुलांतून होता; पण दारूड्यांचे बडबडणें गांवांतून नव्हते. पंकस्थिति म्हणजे पापरति लोकांत नव्हती. पंक म्हणजे चिखलांत राहणें, कमलांना व शेतक-यापुरतेच होते. बहुरंगीपणा लोकांत मुळींच नसून मोरपिच्छांतून तेवढा होता. स्वतःला वेढणाच्या नागवेलीच्या पानांच्या कांतीनें ज्यांनी दिग्भागाला हिरवंगार केलें आहे अशा सुपारीच्या झाडांनी गजबजलेलीं विदेह देशांतील गांवें चमकणाऱ्या अमूल्य पाचरत्नांनी बनविलेल्या उंच तटपंक्तींनी वेढल्याप्रमाणे शोभत होती. तो देश आश्रित लोकांची तहान भागविणाऱ्या, तळभागी नेहमी स्वच्छ असलेल्या, कमळांनी व हंसपक्ष्यांनी भरलेल्या अशा अनेक सरोवरांनीं जसा शोभत होता तसाच आश्रित लोकांच्या आशातृष्णा शमविणाऱ्या, हृदयांत नेहमी प्रसन्नता धारण करणान्या, संपत्तीने युक्त व निर्दोष अशा ब्राह्मण क्षत्रिय व वैश्यांकडून आदरणीय अशा असंख्य सत्पुरुपांमुळे चोहोंकडे प्रख्यात होता. या विदेह देशांत करताडन मृदगावरच होई एकमेकांवर होत नसे. बंधन घोड्यांनाच होतें, लोकांना नव्हते. द्वंद, उपसर्ग, गुणलोप, विकार वगैरे समाजांत नव्हते; व्याकरणांत तेवढे होते. अशा या विदेह देशांत सगळ्या वस्तूंना आश्रय देणारे, सूर्य, चंद्र, बुध, वृषभरास व तारागणांनी युक्त अशा आकाशाप्रमाणे शोभिवंत जगविख्यात असें कुंडनपुर नांवाचें नगर होतें. या नगरांतहि सर्व प्रकारच्या वस्तु होत्या; अनेक प्रखर कलांना धारण करणारे विद्वान् होते. गोधन व सुवर्ण, रौप्य, मौक्तिकहि या नगरीत भरपूर होते. तटाला बसविलेल्या प्रराग रत्नांच्या प्रतिबिंबामुळे व्याप्त झालेला खंदक दुपारीहि सायंकाळची शोभा गांवाला देत असे. कुंडनपुरांतील स्त्रिया निर्मळ अंत:करणाच्या, मनोहर व सर्वालंकृत होत्या. शहरांतील वाडे अतिशय उंच, चंद्रप्रकाशामुळे धवल दिसणारें. गम्बीला जडवलेल्या रत्नांमुळे पल्लवयुक्त भासणारे व स्त्री परिवारांनी गजबजलेले आहेत. ( ५० ) 22
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy