SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 73
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ जन्मस्थान व वर्षनिर्णय. . अशा ह्या वैशाली नगरीजवळ असलेले कुंडग्रामच महावीर भगवानांचे जन्मस्थान होय. वैशालीच्या जवळच असलेले कौलागग्रामही महावीरस्वामींचे जन्मस्थान म्हणून सांगतात; कारण तेथेंहि नाथ किंवा ज्ञातिवंशाचे क्षत्रिय राहात होते; पण तसा जैनग्रंथांतून उल्लेख नाही. बौद्धांच्या महावग्गनामक ग्रंथांत लिहिलेले आहे की, एकदां महात्मा बुद्ध कोटिग्रामला आले असता ते एका ज्ञातिवंशाच्या क्षत्रियाचे घरीं उतरले होते. तेथून ते पुढे वैशालीला गेले. यावरून कुंडग्राम किंवा कोटिग्रामाचे अस्तित्व सिद्ध होते; तसें कौल्लागग्रामाचे अस्तित्व सिद्ध होण्यास आधार नाही. हल्लींहि राजग्रहाजवळ कुंडलपूर म्हणन एक गांव आहे; पण कुंडग्रामाची ती बरोबर जागा नव्हे. आतापर्यंत महावीरस्वामींच्या जन्मस्थानाचा विचार झाला. आतां जन्मवर्षाचा विचार करूं. महाव रस्वामी बहात्तराव्या वर्षी मोक्षाला गेले याबद्दल एकमत आहे; पण त्या वर्षाबद्दल तीन मतें प्रचलित आहेत. इ. स. पू. ५२७ वें वर्ष में अन्यच अंशी मान्य आहे. दुसऱ्या मतानुसार ते इ. स. पू. ४६८ आहे व तिसऱ्या मतानुसार ते इ. स. पू. ६०६ हे होय. पहिले मत हही सर्वत्र रूढ आहे. त्याला खालील आधार दिले जातात. नन्दीसंघाच्या दुसऱ्या पटावलींत खालील गाथा आहे. " सत्तरि चदुसदजुत्तो तिणकाला विकमो हवइ जम्मो । अठवरस बाललीला सोडस वासे हि भम्मिए देसे ॥ १८॥ महावीरनिर्वाणानंतर ४७० वर्षांनी विक्रमाचा जन्म झाला, आठ वर्षे बाललीला केली, वगैरे वरील श्लोकाचा भावार्थ आहे. तिलोयपण्णत्तीत खालील गाथा आहे. “णिवाणे वीर जीणे छब्बीस सदेसु पंच वरिसेसु । पण मासेसु गतमु संजादो सगणिओं अहवा ॥ वीरनिर्वाणानंतर सहाशे पांच वर्षे पांच महिने लोटल्यावर शक राजा झाला, असा वरील श्लोकाचा भावार्थ आहे. त्रिलोकसारांत खालील श्लोक आहे, पण छस्सयवस्सं पण मासमुंद गमिय वीरण्णिव्वु इदो । सगराजो तो ककी चदुनवमिय म हय सगमासं ॥ ८५० ॥ वीरनिर्वाणानंतर ६०५ सहाशे पांच वर्षे पांच महिने लोटल्यावर शक राजा झाला. व तीनशे चौयाण्णव वर्षे सात महिने लोटल्यावर कल्की झाला असे वरील गाथेत म्हटले आहे. आयविद्यासुधाकरांत खालील श्लोक आहेत. “ ततः कलिनाचखंडे भारते विक्रमात्पुरा । स्वमुन्यं बोधिविमते वर्षे । वीराव्हयो नरः ॥ प्राचारज्जैनधर्मबौद्धधर्मस्तमप्रभम् ॥ बौद्धधर्मासारख्याच प्रभावी धर्माच्या वीर (५१)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy