SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 71
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ जन्मस्थान व वर्षनिर्णय वरून वरील रूढीचे बंधन हितकारक होते; समाजघातुक नव्हते असे स्पष्ट दिसून येते. असो. लिच्छवी गणराज्याजी राजधानी वैशाली होती. राजधानीजवळच कुन्डपुर म्हणून गांव होते. तेथे राजा सिद्धार्थ रहात असे. त्यांचे घराणे फार पूर्वीपासून जैनधर्माचे अनुयायी होते. जैनग्रंथांतून वैशाली नगरी चेटक राजाची राजधानी होती असे लिहिलेले आहे. अर्थात् लिच्छवीवंशाची जी गणराज्ये होती त्यांचे मुख्य प्रथक वैशाली हे असले पाहिजे. वैशाली नगरीजवळ कुंडग्राम किंवा कुंडलपूर होते. सिद्धार्थाला कुंडग्रामचा राजा म्हणून जैन ग्रंथांत लिहिलेले आहे. सिद्धार्थ राजाच्या कुलाचें नांव :त होते म्हणून महावीरस्वामींना नातपुत्र म्हणून बौद्ध व काही जैन ग्रंथांतून संबोधिलेले आहे. ज्ञातकुलातर्फे राजा सिद्धार्थ वज्जियन संघांत प्रतिनिधि होते व त्याकाळी प्रतिनिधीनांच राजा ही पदवी होती. वैशाली नगरी फार विशाल होती, म्हणनच तिला ते नांव पडले. चिनी प्रवासी यानाचाना याने वैशाली नगरीचा विस्तार वीस चौ. मैल असल्याचे लिहिले आहे. या नगरीच्या आसपास तीन किल्ले आहेत असेहि त्याने लिहिले आहे. वज्जियन संघांत जे वंश सामील होते त्या वंशांच्या राजधानीत किल्ले असत. वैशालीनगरीजवळच कुंडग्राम होते व ती ज्ञातवंशाची राजधानी होती. अशाच आणखी दोन वंशांच्या राजधान्या वैशाली नगरीजवळ असाव्यात. वृजदेश सोळाशें मैलांच्या परिघाचा आहे असें यानाचानाने लिहिले आहे. या देशाचे त्याने केलेले वर्णन ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तो लिहितो की, हा देश समृद्ध आहे; आंबे, केळी वगरे फळांची झाडे पुष्कळ आहेत. लोक विश्वासू, शुभवत् कार्यरत, उदार, विद्याप्रेमी व सुसंस्कृत आहेत. घरे मुंदर व कलाकौशल्याने भरलेली आहेत. मनमोहक देवमंदिरें ठिकठिकाणी आहेत. बागबगीचेहि लोकवस्तीतून आहेत. हा देश स्वर्गतुल्य आहे : हल्लीच्या मुझफरपुर जिल्ह्यांतील बसाड गांवाचे जागीच पूर्वी वैशाली नगरी होती असा अंदाज आहे. इतर भागाच्या मानाने हल्लीहि हा भाग समृद्ध आहे. मग त्यावेळी तो तसा असेल त्यांत नवल काय ? वरील ऐतिहासिक वर्णनाप्रमाणेच अशगकवीचे काव्यात्मक वर्णन आहे. आपल्या महावीरचरित्राच्या सतराव्या सर्गात विदेहदेशाबद्दल कवि लिहितो " या भरतक्षेत्रात प्रसिद्ध सत्पुरुषांची उत्कृष्ट निवासभूमि असा विदेह नांवाचा देश आहे. हा सुसंपन्न आहे व खरोखर पृथ्वविरील सर्व शोभिवंत
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy