SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 50
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ जैनधर्माचें प्राचीनत्व कडील आहे असें लो. टिळकांनी साधार सिद्ध केले आहे. तेव्हां नवव्या तीर्थकराचे वेळी आलेले हे उत्तर ध्रुवाकडील रानटी लोकच वैदिक मिथ्यात्वाचे जनक असावेत असे म्हणण्यास काही हरकत नाही. पण भारतीय तत्वज्ञानाशी त्यांचा अधिकाधिक संबंध येत गेल्यावर वैदिक आर्यात अनेक पंथ निघाले व बरीच सुधारणा झाली. वैष्णवादि वैदिक पंथांचे तत्वज्ञान भिन्न असले तरी जैन विचारसरणीची छाप त्यांच्यावर पडलेली दिसते. उपनिषदांतील विचार भारतीय संस्कृतीच्या संस्काराचेच परिणाम होत. कोठे ती उत्तरध्रुवाकडून आल्याबरोबरची हिंसक व जडदृष्टि व कोठे नंतरची सूक्ष्म व अहिंसक दृष्टि ' हा सर्व परिणाम जैनसंस्कृतीचाच होय. वेदांतून जैनतत्वज्ञान फुटून निघाले आहे असे काही वेदाभिमानी म्हणतात, पण ते सिद्ध करून दाखविणे त्यांना अशक्य आहे. जैनांची अहिंसादि महावतें, कर्मसिद्धांत, स्याद्वाद पद्धति, ईश्वराची कल्पना या इतक्या स्वतंत्र आहेत की, त्या वेदाच्या भारूडातुन निघणे शक्यच नाही. पण वेदांतील ऋचांच्या अर्थावर मात्र वरील सिद्धांतांचा आरोप करता येणे शक्य आहे. ही जैन म्हटल्या जाणाऱ्या लोकांची संख्या अल्प आहे म्हणून तो धर्म अर्वाचीन व हिंदूंनी संख्या मोठी आहे म्हणून तो धर्म प्राचीन म्हणू गेल्यास काही कालानंतर ख्रिश्चन व मुसलमानी धर्महि फार प्राचीन ठरतील. महावीराने यज्ञ व चातुर्वण्याविरुद्ध बंड करून निराळा पंथ काढला असे म्हणतात, पण हिंसात्मक यज्ञ व चातुर्वण्यांतील उच्चनीचपणा न मानणारी संस्कृति महावीरांनी सुरू केली नसून केवळ तिचे पुनरुद्धारक ते होते हे विसरता कामा नये. बुद्धाने कदाचित् वेदांविरुद्ध बंड पुकारले असे म्हणतां येईल. कारण तो त्या परंपरेतील होता. महावीरांची परंपरा दुसरी. तेव्हां ही परंपरा बंडखोर ठरत नसून कदाचित प्रतिस्पर्धी ठरेल. या प्रतिस्पर्धी परंपरेचाच शेवटी हिंसात्मक परंपरेवर विजय झाला असेंच दिसून येते. सरळ अर्थाने वेदांत जें नाहीं तें वेदप्रामाण्य मानणाऱ्या ग्रंथातून लिहिले गेले, व वेदांचे अर्थ वाटेल तसे फिरवूनहि या नव्या ग्रंथांना आधार देण्यात आले. याप्रमाणे वैदिक बदलले. उलट जैनसिद्धांत त्रिकालाबाधित आहे. प्रत्येक कल्पांत तो एकसारखाच आहे. वर्तमान चोवीस तीर्थकरांतहि आदि तीर्थकर वृषभनाथांनी जे उपदेशिलें तेंच अंतिम तार्थंकर महावीरांनीही सांगितले म्हणून वेदांतून जैनसिद्धांत उत्पन्न झाला किंवा त्याविरुद्ध बंड करून तो निघाला हे म्हणणे चुकीचे असून वैदिकावर जैन (२१)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy