SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 51
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र सिद्धांताची छाप पडली हेंच म्हणणे रास्त होय. प्रारंभी वैदिक जैनसिद्धांत जाणूंच शकले नाहीत व म्हणून त्यांनी त्याचा विपर्यास करून पाखंड प्रवर्तविलें. पुढे जैन सिद्धांताला शिव्या देतदेतच वैदिकांनी बरेचसे सिद्धांत आत्मसाद केले व ariat त्यांना मान्य करावे लागतील. कारण तेच त्रिकालाबाधित सत्य सिद्धांत आहेत. आज आचरणाच्या दृष्टीनें जैन व उच्च वर्णीय वैदिक यांच्यामध्ये विशेष फरक राहिलाच नाहीं. इतका त्यांनी जैनसिद्धांत पचवून टाकिला आहे. असो. जैनधर्म वेदांतून निघालेला नाहीं, मग तो बौद्धधर्मातून निघाला हें म्हणणें अगदींच असंबद्ध आहे. उलट जैनसिद्धान्ताच्या पायावर यज्ञमार्गी वैदिकाविरुद्ध पुकारलेले बंड म्हणजेच बौद्धधर्म असें म्हणतां येईल. वेदकालीन किंवा उत्तरध्रुवावरून आल्याबरोबर आर्यांना जैनसिद्धांन्त न पटल्यामुळे प्रारंभीं जरी त्याचा त्यांनी विपर्यास केला तरी पुढे जैनतीर्थकर व मुनिगणाबद्दल वैदिकांचा आदर वाढत गेला व जैनसिद्धांत त्यानी आत्मसात केला असें पष्ट दिसतें. उपनिषदांतील विचार व सांख्यादि दर्शनें व वैष्णवादि पंथ हे जैन सिद्धांतांतील एकेका विचारांचेच प्रतिध्वनि होत. वेदांत ज्याप्रमाणे तर्थिंकर व निर्ग्रथ साधुबद्दल आदराचे उद्गार आहेत, तसे पुराणांतूनहि आहेत. “ ॐ नमो ऽर्हतो ऋषभो । व ॐ त्रैलोक्य प्रतिष्ठितांना चतुर्विंशति तीर्थकराणाम् । ऋप्रमादि वर्धमान्तानां सिद्धानां शरणं प्रपद्ये ॥ ह्रीं वचनें वैदिक ग्रंथांतीलच आहेत. " अष्टषष्टि तीर्थेषु यात्रायां यत्फलं भवत् । श्री आदिनाथ देवस्य स्मरणेनापि तत्फलम् ॥ हा श्लोक मनुस्मृतीच्या जुन्या प्रतींतून मिळतो म्हणतात. योगवासिष्ठांत खुद्द रामचंद्राचेच तोंडी हा श्लोक आहे. 'नाहं रामो न मे वांछा भावेषु च न मे मनः । शान्तिमास्थातुमिच्छामि स्वात्मन्येव जिनो यथा ॥ अ. १५ श्लो. ८. दिगंबर श्रमणांना आहारदान दशरथ राजानें केलें असा उल्लेख वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग १४ श्लोक १२ मध्ये आहे. महाभारत वनपर्व अ. १८३ मध्ये अरिनेमिचा उल्लेख आहे. मार्कडेय पुराणांत ऋषभदेवांचे वर्णन आहे. याप्रमाणे व्यासमहर्षिकृत पुराणांतूनहि जैन तीर्थकरांचा व साधूंचा उल्लेख आहे. केवळ अध्यात्मिक बाबतीतच जैन थोर होते असें नव्हे, तर व्यापाराचा सर्व मक्ता जणुं काय जैन वैश्याकडेच होता व तीच परंपरा अझूनही थोड्या प्रमाणांत चालूं आहे. प्राचीनकाळी जैन व्यापारी अमेरिका, युरोप व आफ्रिका खंडांतून व्यापारासाठी जात व तेथे त्यांनी स्थापन केलेल्या जिनमूर्ति हल्ली संशोधकांना सापडूं लागल्या ( २२ )
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy