SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 49
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र ल्यामुळे लिंगांगों धर्म हा यज्ञमार्गी वैदिकधर्मापेक्षा फार प्राचीन होय असें म्हटले जाते. असो. श्री संभवनाथांनी बरीच वर्षे राज्य करून पुढे तपश्चर्या केली व केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर धर्मप्रसार करून सम्मेदशिखरावरून ते मोक्षाला गेले. त्यांचे नंतर कोट्यावधि वर्षांनीं अयोध्यानगरीत इक्ष्वाकुत्रंशाचे राजा संवर व राणी सिद्धार्थ यांचे पोटीं अभिनंदन तीर्थकरांनी माघ शुद्ध २ ला जन्म घेतला. बरीच वर्षे संसार केल्यावर दीक्षा घेऊन ते केवलज्ञानी झाले व पुढे धर्मप्रभावना करून सम्मेदशिखरावरून मोक्षाला गेले. पुढे असंख्य वर्षांनंतर अयोध्येतच मेघरथ राजा व सुमंगल देवीचे पोटी सुमतिनाथ तीर्थकर वैशाख शुद्ध ८ मीस जन्मले. यांनीहि बरीच वर्षे राज्य केल्यावर दक्षिा घेऊन व केवलज्ञानी बनून धर्मप्रसार केला व संमदेशिखरावरून ते मोक्षाला गेले. त्यांचे नंतर असंख्य वर्षांनी कौशांबीपुरांत राजा मुकुटवर व राणी सुसीमा यांचे पोर्टी पद्मप्रभतीर्थकर कार्तिक व. ११ स जन्मले. त्यांनीहि मागील तीर्थकराप्रमाणेच धर्मप्रभावना करून संमेदशिखर पर्वतावरून मुक्ति मिळविली. त्यांचेनंतर काशी क्षेत्रों राजा सुप्रतिष्ट व राणी सुसीमा यांचे पोटी सुपार्श्वनाथ तीर्थकर भाद्रपद व ८ मसि जन्मले व त्यांनीहि धर्मप्रभावना केली. नंतर चंद्रपुरीचे राजा व राणी लक्ष्मणा यांचे पोटीं चंद्रप्रभ तर पौष वद्य ११ स जन्मले व धर्मप्रभावना करून मोक्षाला गेले. त्यानंतर नववे तीर्थकर कौकंदीपुरीचे राजा सुग्रीव व राणी जयरामा यांचे पोर्टी पुष्पदंत किंवा सुविधिनाथ यांनी जन्म घेतला व धर्मप्रभावना करून ते मोक्षाला गेले. यांच्या काळांत वैदिक मिथ्यात्वाला सुरवात झाली. या काळापर्यंत शुद्धधर्म प्रचलित होता. पण तेथून पुढे धर्माचें नांवावर वाटेल ती थोतांडे सुरू झाली. उत्तर ध्रुवाकडून कांहीं रानटी टोळ्या याच सुमारास भरतखंडांत आल्या व येथें त्यांनी बराच धुमाकूळ माजविला. कांही वर्षांनंतर त्यांच्यावर येथील संस्कृतीची छाप पडली पण त्यांची तितकी लायकी नसल्यामुळे धर्माचा त्यांनी विपर्यास केला. आत्मिक शक्तींना भौक्तिक शक्तीच समजून त्यांनाच त्यांनी देवतांचें रूप दिलें, व त्यांच्या नांवावर मांसभक्षण, सुरापान, परदारागमन वगैरे स्वेच्छाचारास यथेच्छ सुरवात केली. रानटी लोक असा स्वेच्छाचार नेहमींच करतात; पण यांनीं तो धर्माचे नावावर सुरू केला; व त्यामुळे मिथ्यात्व सुरू झाले. वेदांमध्यें जी वर्णनें दिसून येतात त्यांचा सूक्ष्म अर्थ केला तर तो अध्यात्मपरच आहे. पण वरवरचा सर्व अर्थ अनीतिमूलकच आहे. त्यांतील नैसर्गिक वर्णन उत्तर ध्रुवा( २० )
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy