SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 35
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र त्यांना कोणी ओळखले नाही. व काहीजणांचा तर छञ्च झाला. पण तीर्थकरांचे तसे नाही. त्यांची खूण भव्यात्म्यांना पटतेच. त्यांचा छळ झाला तर तो त्यांच्या पूर्वकर्माचाच उदय होय; व गौरव होतो तोहि त्यांच्या आत्मतेजाचाच परिणाम होय. त्यांना कोणी शत्रुच नसल्यामुळे त्यांचा छळ कोणी करीत नाही, व त्यांचे माहात्म्य वर्णावयास भक्तांची व पट्टशिष्यांचीहि जरूर नाही. पाणी तृषा शमन करतें म्हणून सांगावे लागत नाही, व तहानलेल्याला पाणी पी म्हणून सांगावेंहि लागत नाही, तीर्थकर स्वयंप्रकाशी असतात व त्यांच्याकडे आकर्षिले जाणे हा सर्व भव्यजीवांचा स्वभावच आहे. आतां असे तीर्थंकर कोण होऊ शकतात तें जैनशास्त्रांत खालीलप्रमाणे वर्णिलेले आहे. तीर्थकरजीवाची तयारी अनेक पूर्वजन्मांतूनच होत असते. उदाहरणार्थ राम व कृष्ण चक्रवर्तीना होऊन कितीतरी पिढ्या लोटून गेल्या, पण ते भविष्यकालीं तीर्थंकर होणार आहेत. तशी त्यांची तयारी चालं आहे व काही झालेली आहे. षोडशकारणभावना ज्या जीवाला झाल्या तो तीर्थकर होणारच. त्या भावना पूर्णपणे एखाद्या जीवाला झाल्या की नंतरच्या तिसऱ्या जन्मांतच तो तीर्थकर होतो असा नियम आहे. या भावना काय आहेत तेच आता पाहूं. पहिली भावना दर्शनविगुद्धि. सम्यकज्ञान, सम्यकदर्शन व सम्बक्चारित्र ही रत्नत्रयी प्राप्त झाल्याशिवाय मोक्षदशा साधत नाही. देवमूढत्व, लोकमुडत्व व पाखंडीमूढत्व असें मूढत्य; जाति, कुल, ऐश्वर्थ, रूप, ज्ञान, बळ, तप व कीर्ति या अष्टकाचा अभिमान म्हणजे अष्टमद; पुदेव, कुगुरु व कुशास्त्र व तीन्हीचे उपासक मिळून सहा अन्यायतने; आणि शंका, कांक्षा, जुगुप्सा, मृढदृष्टि, अनूपगृहन, अस्थितिकरण, अवात्सल्य व अमार्गप्रभावना हे आठ दोष यामुळे दर्शनमलीन होते हे जाणून त्यांचा त्याग करणे ही दर्शनविशुद्धि होय. ही पहिली भावना तर्थिकरत्व प्राप्त होण्यास आवश्यक आहे. दुसरी भावना विनयसंपन्नता. दर्शनविनय, ज्ञानविनय, चारित्रविनय, तपविनय व उपचार विनय हे पांच विनय ज्या जीवांत आले तोच तीर्थकर गोत्र बांधू शकतो. चारित्रविशुद्धि म्हणजे शीलवतेप्वनतिचारः ही तिसरी भावना होय. अतिचारविरहित चारित्र पाळले म्हणजे ही तिसरी भावना पूर्ण होते. ज्ञानविशुद्धि म्हणजे अभीक्ष्णज्ञानोपयोग ही चवथी भावना होय. शुद्ध ज्ञानप्राप्तीसाठी झटल्याने ही भावना पूर्ण होते. पांचवी संयोगभावना म्हणजे विवेकयुक्त वैराग्य शक्तितस्त्याग
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy