SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 34
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तीर्थंकरमाहात्म्य पटत नसलें व बुद्धीला आकलन होत नसलें तरी आप्तांच्या वचनावर श्रद्धा ठेवून त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुभव तसाच मिळेल अशी खात्री आप्त देतातच. तीर्थकर महात्म्याची बाब अशीच आहे. तीर्थंकर म्हणजे शिवाजी, प्रताप, तैमूरलंग, चेंगिझखान, शिकंदर किंवा नेपोलियन नव्हत की त्यांचे इतिहास अजब असले तरी सर्वांना मानावे लागतील. तीर्थकर म्हणजे रामकृष्णादि अवतारहि नव्हत की ज्यांच्या ईश्वरलिीला त्यांच्याशिवाय इतरांना शक्यच नाहीत. रामकृणादि अवतारांप्रमाणे तीर्थकरांमध्येहि कांहीं विशेष आहेतच की जे इतरांना प्राप्त होणे शक्य नाहीं. तथापि अवतारांचे चमत्कार जसे अविश्वसनीय व जगविलक्षण असतात तसे कांही तर्थिकरांचे विशेष नसतात. ते पूर्णपणे शास्त्रसिद्ध व स्वाभाविक असतात. उपमाच द्यावयाची झाल्यास परिस व किमयेची देता येईल. अवताराचे चमत्कार म्हणजे परिस जवळ असल्यामुळे लोखंडाचें सोनें बनविणान्याप्रमाणे होत, व तीर्थंकरांचे विशेष हे किमया जाणणाऱ्या सुवर्णकारासारखे आहेत. परिस व किमया विद्या हीं दोन्ही दुर्मिळच; पण किमयेची विद्या प्रयत्न करणा-या थोड्यांना तरी मिळवितां येते. उलट परिसाला अस्तित्वच नाही. एकंदरीत तीर्थकराचे विशेष कितीहि विलक्षण वाटले तरी त्यांना शास्त्रसिद्ध अस्तित्व आहे. हे जाणून वाचकानीं सम्यक् श्रद्धावान बनले पाहिजे. उगीच भोळी श्रद्धा ठेवण्याचे कारण नाहीं. ती अनिष्टच होय. तीर्थकर म्हणजे तीर्थकारक किंवा तर्थिप्रवर्तक. जन्ममरणाच्या फेऱ्यात सांपडलेल्या आत्म्यांना तरून जाण्याचा मार्ग जे दाखवून देतात ते तथिंकर होत. पण तरून जाण्याचा मार्ग आम्ही दाखवितों असे अनंतव्यसनी फटिंगवावापासून प्रत्येक धर्माच्या शास्त्रीपंडितांपर्यंत व साधुमहात्म्यापर्यंत प्रत्येकजण सांगत आला आहे. त्यांचे उपदेशहि मूलत: बरेच जुळत असले तरी त्यांमध्ये जी इतर मतलबी भेसळ करण्यांत आलेली असते त्यामुळे त्या मूळ सिद्धांतांनाहि हरताळ फासला जातो. समकित बोध व मिथ्या बोध यांमधील फरक हाच. कोणताहि बोध श्रेष्ठच आहे. पण जो बोध निर्हेतुक असेल तोच विशुद्ध व परिगामकारक असू शकतो. ज्याला वाणी आहे तो प्रत्येक बोधवाणी उच्चारू शकेल. पण त्याचीच बोधवाणी शुद्ध व परिणामकारक असू शकेल की जो स्वतः शुद्ध व ज्ञानदर्शन चारित्रबलधारी असेल. कांहीं प्रमाणांत या गोष्टींचा अनुभव सर्वाना नित्य येतोच. आतां असा पूर्ण शुद्ध व बलशाली आत्मा कोण असू (३),
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy