SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 36
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तीर्थंकरमाहात्म्य भावना ही सहावी. यथाशक्ति त्यांग करीत राहिल्याने ही भावना पूर्ण होते. अंतरंग व बहिरंग मोह सोड्न तपश्चर्या केल्याने सातवी भावना पूर्ण होते. नेहमी साधुसमाधीत लीन असणे ही आठवी. भावना होय. दहा प्रकारचे वैयावृत्य म्हणजे सत्सेवा केल्याने नववी भावना पूर्ण होते. अर्हद्भक्तीत नेहमी रममाण असणे ही दहावी भावना होय. जैनाचार्याची सेवा करणे ही अकरावी भावना. बहुश्रुत उपाध्यायांची भाक्ति करणे व जिन वाणीचे अध्ययन करणे ही अनुक्रमें बारावी व तेरावी भावना होय. सामायिका स्तवन, वंदना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान व कायोत्सर्ग अशा सहा आवश्यक क्रिया आहेत. त्या नियमितपणे नित्य केल्याने चौदावी आवश्यक परिहानि भावना प्राप्त होते. जिनमार्ग प्रभावना ही पंधरावी भावना. प्रवचनवत्सलत्व ही सोळावी भावना. पहिल्या चौदा भावना आत्मबल प्राप्त होण्यासाठीच आहेत व नंतरच्या दोन तर आत्मबलप्राप्तीच्या मार्गावरून इतर भव्यजीवांना नेणाऱ्या तार्थकराला तर फारच आवश्यक आहेत. वरील घोडशभावना भाविल्यामुळे भव्यर्जावाला तीर्थकरत्वाची पात्रता येते. जशी तीर्थकर त्वाच्या संख्येला मर्यादा आहे तशीच ज्यांच्याकडून या षोडशभावना पूर्ण होतील अशा भव्यजीवानांहि परिमती आहे हे सांगणे नकोच. __ तीर्थकरत्व प्राप्त होण्यास पूर्वजन्मांतून कोणती तयारी व्हावी लागते त्याचे वर्णन वर केले. आता तीर्थकराला जे शेचाळीस अतिशय असतात ते कोणते तें. पाहूं. जन्मकाळचे दहा अतिशय खालीलप्रमाणे आहेत. बालर्थिकराला मलमूत्र नाही. ( २ ) घान येत नाही. (३) वाणी मधुर व हितकारी असते. (४) रूप लावण्य उत्तम असते. (५) रक्त दुधासारखे असते. (६) शरीर सुगंधित असते. (५) दहयष्टि सुंदर असते. (८) शरीर वद्रासारखे असते. (९) देहावर १००८ शुभ लक्षणे असतात. (१०) बाल तीर्थकर अनंत बलशाली असतो. इतका की नुगत्या हलण्यानेहि मेरू पर्वत हालवू शकतो. पुढे केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर तीर्थकराच्या देहांत दहा बदल होतात. ते खालीलप्रमाणे: (१) तीर्थकर चतुर्मुख दिसतात. (२) त्याच गमन अधर असते. ( ३) त्यांना कोणताहि उपसर्ग बाधू शकत नाही. (४) त्यांना आहार घ्यावा लागत नाही. (५) त्यांची सावली पडत नाही. (६) देहयष्टी स्फटिकवत् असते. (७) नख व केस वाढत नाहीत (८) पापण्या लवत नाहीत (९) ते
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy