________________
गुरू-शिष्य
गुरू म्हणजे गाईड प्रश्नकर्ता : मी पुष्कळ ठिकाणी फिरलो आहे आणि सर्व ठिकाणी मी प्रश्न विचारले की गुरू म्हणजे काय? परंतु मला कुठेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
दादाश्री : समजा, आपल्याला इथून स्टेशनवर जायचे असेल, तेव्हा चालता चालता गोंधळायला झाले आणि स्टेशनचा रस्ता सापडला नाही, आपण वाट चुकलो असू तेव्हा कोणाला तरी विचारण्याची गरज भासते का? कोणाची गरज भासते?
प्रश्नकर्ता : जाणकाराची.
दादाश्री : तो जाणकार म्हणजेच गुरू! जोपर्यंत रस्ता माहीत नसतो तोपर्यंत रस्त्यात कोणाला तरी विचारण्याची आवश्यकता वाटते, एखाद्या लहान मुलास सुद्धा विचारण्याची गरज भासते. म्हणजे ज्यांना-ज्यांना विचारावे लागते, त्यांना गुरू म्हणावे. गुरू असेल तरच मार्ग सापडतो. हे डोळे नसतील तर काय होईल? गुरू, हेच दुसरे डोळे आहेत ! गुरू म्हणजे जो आपल्याला पुढच्या प्रगतीचा मार्ग दाखवितो.
गुरूची गरज कोणाला? प्रश्नकर्ता : आपले म्हणणे असे आहे का की गुरूची गरज आहे ?
दादाश्री : असे आहे ना, जो स्वत:च रस्ता विसरला आहे, म्हणजे रस्ता त्याला माहीत नसेल, स्टेशनला जाण्याचा रस्ता माहीत नसेल तोपर्यंत कठीणच जाते. परंतु रस्त्याचा जाणकार-माहितगार कोणी भेटला तर आपण लगेच स्टेशनवर पोहचू ना?