Book Title: Satya Asatya Na Rahasya Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 27
________________ सत्य-असत्याचे रहस्य म्हटलेले नाही. साधकांना उद्देशून म्हटले आहे. त्यास हे व्यवहारातील संसारी लोक धरुन बसले आहेत. म्हणजे मग ती चूक होणारच ना?! लोक उलटेच समजले. लोक तर चोपडण्याचे औषध पिऊन टाकतील असे आहेत. ज्यांनी हे औषध दिले असेल, (त्यांनी) हा शब्द ह्या अपेक्षेने म्हटला आहे. त्यागी लोकांना त्याग करण्याच्या अपेक्षेने म्हटले आहे. आता जर लावण्याचे औषध पिऊन टाकले तर काय होईल? खलास होऊन जाईल, सर्व संपून जाईल! 'जग मिथ्या' असे म्हटले तर साधकांना यात रस-रुची राहत नाही आणि त्यांचे चित्त मग आत्म्याकडे राहते. म्हणून 'मिथ्या' म्हटले आहे. हे तर एक हेल्पिंग प्रॉब्लेम (अडचणींमध्ये सहाय्य करणारा) आहे. वास्तवात ही एक्झेक्टनेस नाही. तरच मिळते सत्याचे स्पष्टीकरण म्हणून आम्ही सत्य, रिलेटिव सत्य आणि मिथ्या असे तीन भाग पाडले. जेव्हा की जगाने दोनच भाग पाडले, सत्य आणि मिथ्या. पण तो दुसरा भाग लोकांना एक्सेप्ट होत नाही ना! 'चंदुभाऊने माझे बिघडवले' एवढेच जर ऐकण्यात आले, तो सांगणारा नंतर विसरुनही गेला असेल पण ही गोष्ट तुम्हाला रात्री हैराण करते. मग त्यास मिथ्या कसे म्हणू शकतो? आणि समजा आपण भिंतीला दगड मारला आणि नंतर झोपून गेलो, तरीही भिंतीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. म्हणून आपण तीन भाग पाडले की एक सत्य, दुसरे रिलेटिव सत्य आणि तिसरे मिथ्या! जेणेकरून त्याचे सविस्तर स्पष्टीकरण मिळते. अन्यथा असे स्पष्टीकरण मिळणारच नाही ना! फक्त आत्म्यालाच जर सत्य म्हटले तर काय हे जग पूर्णपणे असत्यच आहे ? मिथ्या आहे हे? यास मिथ्या म्हणूच कसे शकतो? जर मिथ्या आहे तर विस्तवावर हात ठेवून पाहा. मग लगेच समजेल की 'मिथ्या आहे की नाही!' जग रिलेटिव सत्य आहे. हे ज्यामुळे रडू येते, दुःख होते, भाजले जाते, त्याला मिथ्या कसे म्हणायचे?! प्रश्नकर्ता : जग मिथ्या म्हणजे इल्युजन नाही का?

Loading...

Page Navigation
1 ... 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64