Book Title: Right Understanding To Helping Others Benevolence Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
View full book text
________________
34
सेवा-परोपकार
एक भाऊ मला एका मोठ्या आश्रमात भेटले. मी विचारले, 'तुम्ही येथे कुठे?' त्यावर तो म्हणाला, 'मी या आश्रमात गेल्या दहा वर्षांपासून राहत आहे.' तेव्हा मी त्याला म्हटले, 'गावात तुमचे आई-वडील उतार वयात खूप गरिबीत, दुःखात जगत आहेत.' त्यावर तो म्हणाला,' त्यात मी काय करु? मी त्यांचे करायला गेलो तर माझा धर्म करायचा राहून जाईल.' याला धर्म कसे म्हणणार? धर्म करणे म्हणजे आई-वडीलांना, भावांना सगळ्यांना धरुन चालणे, त्यांची विचारपुस करणे, आदर्श व्यवहार असायला हवा. जो व्यवहार स्वतःच्या धर्माचा तिरस्कार करतो, आईवडीलांच्या नात्याचा तिरस्कार करतो त्याला धर्म कसे म्हणणार?
तुमचे आई-वडील आहेत की नाही? प्रश्नकर्ता : आई आहे.
दादाश्री : आता चांगली सेवा करा. वारंवार संधी मिळणार नाही आणि कोणी म्हणेल की, 'मी दुःखी आहे.' तर मी त्याला सांगेल की तुझ्या आई-वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा कर, तर संसारातील दु:खं तुला येणार नाहीत. भले श्रीमंत होणार नाही, पण दुःखीही होणार नाही. नंतर धर्म असावा. याला धर्म कसे म्हणणार?
मी सुद्धा आईची सेवा केली होती. तेव्हा मी वीस वर्षाचा अर्थात् तरुणच होतो, म्हणून आईची सेवा करु शकलो. वडिलांना खांदा दिला होता तेवढीच सेवा झाली होती. मग विचार केला की अरे, असे तर कितीतरी वडील होऊन गेलेत, आता काय करणार? तेव्हा उत्तर मिळाले, जे आहेत त्यांची सेवा कर. जे गेले ते गेले त्यांची चिंता करु नकोस. सगळे खूप झाले. चूकलात तेथून परत मोजा. आई-वडिलांची सेवा प्रत्यक्ष रोख आहे. भगवंत दिसत नाहीत, हे तर दिसतात. भगवंत कुठे दिसतात? आई-वडील तर दिसतात.
खरी आवश्यकता वृद्धांच्या सेवेची आता जर सगळ्यात जास्त कोणी दुःखी असतील, तर ते साठपासठ वयाचे वृद्ध खूप दुःखी आहेत. पण ते कोणाला सांगतील? मुलं