________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१४९
तर गिळून टाकण्यासारखे आहे. नवरा अपमान करतो तेव्हा लक्षात यायला हवे की हा तर माझ्या कर्माचे उदय आहे. यात नवरा मात्र निमित्तच आहे, निर्दोष आहे. जेव्हा माझ्या कर्माचा उदय बदलतात तेव्हा तोच नवरा मला 'ये,ये' असे म्हणतो. म्हणून मनात समताभाव ठेवून प्रश्न सोडवत राहिले पाहिजे. जर असे मनात आले की 'माझा काहीच दोष नसताना नवरा मला असे का म्हणाला?' मग रात्री तीन-चार तास जागरण होईल आणि मग थकून झोप लागेल.
जे भगवंताचे वरिष्ठ झाले, त्यांचे काम झाले. आणि जे बायकोचे वरिष्ठ झाले (बायकोवर हुकुमत गाजवत बसले) ते मार खाऊन मेले. वरिष्ठ बनायला गेले ते मार खात गेले. पण भगवंत काय म्हणतात? माझे वरिष्ठ बनलात तर मला आवडेल. मी खूप दिवस वरिष्ठपणा केला, आता तुम्ही माझे वरिष्ठ व्हा की मग जास्त चांगले.
'ज्ञानी पुरुष' जी समज देतात त्या समजमुळे मुक्ती मिळते. समजशिवाय काहीच होऊ शकत नाही. वीतराग धर्मच सर्व दुःखांपासून मुक्ती देते.
घरात सुंदर व्यवहार करता आलाच पाहिजे. बायकोला मनापासून असे वाटले पाहिजे की, असा चांगला नवरा पुन्हा कधीच मिळणार नाही. आणि नवऱ्यालाही असे वाटले पाहिजे की अशी बायकोही कधीच मिळणार नाही!! असा सुंदर हिशोब जुळवून आणला तर समजावे की आपण खरे!!!