Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 21
________________ कर्माचे विज्ञान की जिथे वरिष्ठपणा असेल. भगवंत तुमचे वरिष्ठ नाहीत. तुमचे जोखिमदार तुम्ही स्वत:च आहात. सर्व जगातील लोकं मानतात की जग भगवंतांनी बनवले. पण जे पुर्नजन्माचा सिद्धांत समजतात त्यांच्याकडून असे मानले जाऊ शकत नाही, की जग भगवंताने बनविले आहे. पुनर्जन्म म्हणजे काय की 'मी करतो' आणि 'मी भोगतो.' आणि माझ्याच कर्माचे फळ मी भोगतो आहे. यात भगवंतांचा हस्तक्षेप नाहीच. स्वतः जे काही करतो ते स्वत:च्या जबाबदारीवरच करतो. कोणाच्या जबाबदारीवर आहे हे, हे समजले ना? प्रश्नकर्ता : आजपर्यंत असे समजत होतो की भगवंतांची जबाबदारी आहे. दादाश्री : नाही. स्वत:चीच जबाबदारी आहे! होल ॲन्ड सोल रिस्पॉन्सिबिलिटी (संर्पूण जबाबदारी) स्वत:चीच आहे, पण मग त्या माणसाला गोळी का मारली? तो जबाबदार होता म्हणून त्याला त्याचे हे फळ मिळाले आणि हा मारणारा जेव्हा जबाबदार ठरेल, तेव्हा त्याचे फळ त्याला मिळेल. त्याची वेळ येईल तेव्हा त्याचे फळ मिळेल. जसे, आज जर कैरी झाडाला लागली, तर आजच्या आज कैरी आणून तिचा रस काढू शकणार नाही. ते तर वेळ आल्यावर, ती मोठी होईल, पिकेल, तेव्हा रस निघेल. त्याचप्रमाणे ही गोळी लागली, पण त्या अगोदर ती पिकून तयार होते, तेव्हा ती लागते. अशीच लागत नाही. आणि मारणाऱ्याने गोळी मारली त्याची आज एवढी छोटी कैरी झाडाला लागली आहे, ती मोठी झाल्यावर पिकेल, त्यानंतरच तिचा रस निघेल. कर्मबंधन, आत्म्याला की देहाला? प्रश्नकर्ता : तर मग आता कर्मबंधन कोणाला होते. आत्म्याला की देहाला? दादाश्री : हा देह तर स्वतःच कर्म आहे. मग दुसरे बंधन त्याला कूठून होणार? हे तर ज्याला बंधन वाटत असेल, जो जेलमध्ये बसला असेल त्याला बंधन आहे. जेलला बंधन असते की जो जेलमध्ये बसला असेल त्याला बंधन असते? अर्थात हा देह जेल आहे आणि त्याच्या आत

Loading...

Page Navigation
1 ... 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94