Book Title: Chinta
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 18
________________ चिंता एका बाजूला म्हणतात कि, 'श्री कृष्ण शरणं मम' आणि जर श्री कृष्णाला शरण गेलात, तर मग चिंता कशाला? महावीर भगवंतानेही चिंता करण्यास मना केले आहे. त्यांनी तर एक चिंतेते फळ तिर्यंच (जनावर)गती म्हटले आहे. चिंता तर सगळ्यात मोठा अहंकार आहे. 'मीच हे सगळे चालवतो' असे जबरदस्त राहते ना, त्याचे फळस्वरूप चिंता निर्माण होते. मिळाला एकच ताळमेळ सगळीकडून चिंता तर आर्तध्यान आहे, हे शरीर जितके शाता-अशाताचा उदय घेऊन आले आहे, तेवढे भोगल्यावरच सुटका आहे. म्हणून कोणाचा दोष बघु नका, कोणाच्या प्रति दोषित दृष्टि करु नका आणि स्वतःच्या दोषांनेच बंधन आहे असे समजा. तुझ्याकडून काहीही बदल होणारा नाही. ___ यावर श्रीकृष्ण भगवंताने सांगितले आहे कि, 'जीव तू काहे सोच करे, कृष्ण को करना हो सो करे'. त्यावर जैन काय सांगतात कि, 'हे तर श्री कृष्ण भगवंताने सांगितले, महावीर भगवंताने असे नाही सांगितले' महावीर भगवंताने यावर काय सांगितले कि 'राईमात्र वधघट नहीं, देख्या केवळज्ञान' ये निश्चय कर जाणिए, त्यजिए आर्तध्यान'. चिंता व आर्तध्यान सोडा. पण भगवंताचे म्हणणे मानले तर ना? नाही मानायचे असेल, त्याला आम्ही काय म्हणणार? मला असे सांगितले होते, तेव्हा मी तर मानले होते. मी सांगितले, हां भाऊ, पण ही एकच अशी गोष्ट आहे, म्हणून दुसऱ्या ठिकाणी शोध केला. जे महावीर भगवानने सांगितले, तेच कृष्ण भगवानने सांगितले, तेव्हा मी सांगितले, इथे ताळमेळ मिळतो, तरीपण जर काही चुक होत असेल, तर पुढे शोध करा. तेव्हा सहजानंद स्वामी म्हणतात, 'माझ्या मर्जी शिवाय, कोणी पान तोडू शकत नाही'. ओहो, आपण तर जबर आहात! कि आपल्या शिवाय एक पान ही नाही तूटत? तेव्हा सांगितले, 'चला तीन ताळे मिळाले.' तेव्हा मी सांगितले, आणि ताळे मिळवा.

Loading...

Page Navigation
1 ... 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42