Book Title: Aai Vadil Aani Mulancha Vyavhar
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 11
________________ प्रस्तुत पुस्तक दोन विभागात प्रकाशित होत आहे. पूर्वार्ध : आई - वडीलांचा मुलांप्रति व्यवहार. उत्तरार्ध : मुलांचा आई - वडीलांप्रति व्यवहार. पूर्वाधात परम पूज्य दादाजींचे अनेक आई-वडीलांसोबत झालेल्या सत्संगांचे संकलन आहे. आई-वडीलांच्या अनेक मानसिक व्यथा दादाश्रींसमोर वळोवेळी व्यक्त झाल्या होत्या आणि त्यावर दादाश्रींने अचूक उपाय सांगितले आहे ज्यामुळे आई-वडीलांना स्वतःच्या व्यवहारिक समस्यांसाठी समाधान मिळतात. तसेच त्यांना आपले व्यवहारिक जीवन सुधारण्यासाठी किल्ल्याही मिळतात. त्या व्यतिरिक्त दैनंदिन जीवनात मुलांसोबत व्यवहार करताना येणाऱ्या अडचणींचेही अनेक समाधान प्राप्त होतात. जेणे करुन संसार व्यवहार सुखमय परिपूर्ण होवो. आई-वडील आणि मुलांमध्ये जे रीलेटीव संबध आहेत, तात्विक दृष्टिने ज्या ज्या वास्तविकता आहेत त्या सुद्धा ज्ञानी पुरुष समजावतात, जेणे करुन मोक्षमार्गावर पुढे जाण्यासाठी आई-वडीलांची मूर्छित अवस्था दूर होते व त्यांची जागृति उमलत जाते. हे सर्व काही पुस्तकाच्या पूर्वाधात संकलित करण्यात आले आहे. आणि उत्तरार्धमध्ये परम पूज्य दादाश्रींचे लहान मुलं आणि तरुण मुला-मुलींसोबत झालेल्या सत्संगांचे संकलन आहे. ज्यात मुलांनी आपल्या जीवनातील व्यक्तिगत समस्यांवर समाधान प्राप्त केले आहेत. आईवडीलांसोबत कशाप्रकारे व्यवहार करावा ह्याचीही उत्तम समज प्राप्त होत आहे. विवाह करण्या संबंधीही अशी उत्तम समज प्राप्त होत आहे की ज्या मुळे तरुणपिढी आपल्या जीवनात सत्य समजून व्यवहाराचे पूर्णपणे निराकरण करु शकेल. मुलांना आपल्या आई-वडीलांच्या सेवेचे महात्म्य आणि सेवा करण्याचा परिणाम समजावे ह्या साठी दिलेले मार्गदर्शन उत्तरार्धात समाविष्ट झाले आहे. डॉ. नीरूबहन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद 10

Loading...

Page Navigation
1 ... 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101