SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 23
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पैशांचा व्यवहार जगातील सर्व लोकांची मेहनत कोल्हूच्या बैलासारखी वाया जात आहे, तो मालक बैलाला पेंड खायला लावतो, तर इथे बायको चतकोर चपाती वाढते की चालले पुढे ! दिवसभर बैलासारखा राब-राब राबत राहतो. ___अहमदाबादचे शेठजी दोन गिरण्यांचे मालक आहेत, तरी त्यांच्या उकाड्याचे इथे वर्णन होऊ शकत नाही. दोन दोन गिरण्यांचे मालक तरीही केव्हा फेल होतील, हे सांगता येत नाही. तसे तर शाळेत असताना बऱ्यापैकी पास होत होते, पण इकडे फेल होऊन जातील! कारण त्यांनी बेस्ट फुलिशनेसची सुरुवात केली आहे. डिसऑनेस्टी इज द बेस्ट फुलिशनेस!(अप्रामाणिकता सर्वातमोठी मूर्खता आहे) या फुलिशनेसला सुद्धा काही मर्यादा तर असतेच ना? की मग बेस्टपर्यंत ओढतच राहायचे? तर आज बेस्ट फुलिशनेसपर्यंत पोहोचले आहेत. मी पैशाचा हिशोब काढला होता. 'हे पैसे आपण वाढवत वाढवत गेलो तर कुठपर्यंत पोहोचतील?' तर या जगात कुणाचाही पहिला नंबर लागलेला नाही. लोक म्हणतात की ‘फोर्डचा' पहिला नंबर आहे तर चार वर्षात कुणा दुसऱ्याचे नाव ऐकायला मिळते. तात्पर्य असे की कुण्या एकाचा नंबर कायमचा टिकत नाही, निष्कारण इथे धावपळ करत राहण्यात काय अर्थ आहे ? पहिल्या घोड्याला बक्षिस दिले जाते, दुसऱ्या-तिसऱ्याला थोडे कमी दिले जाते. चौथ्याने तर तोंडात फेस काढत-काढत मरायचे? मी म्हटले, 'असल्या रेसकोर्समध्ये मी कशाला उतरु? ही माणसे तर मला चौथा, पाचवा, बारावा किंवा शंभरावा नंबर सुद्धा देतील! तर मग आपण कशाला फेस काढायचा तोंडातून? फेस निघायची पाळी नाही का येणार? पहिला येण्यासाठी घावत सुटला पण नंबर आला बारावा! मग चहा सुद्धा पाजणार नाही कोणी. तुम्हाला काय वाटते? लक्ष्मी ‘लिमिटेड' आहे आणि लोकांची मागणी आहे 'अनलिमिटेड'! कुणाला विषय विकाराची अटकण (जे बंधनरुप होत असते, पुढे जाऊ देत नाही) पडलेली असते, कुणाला मान मिळविण्याची अटकण पडलेली असते. अशा वेगवगळ्या प्रकाराच्या अटकण पडलेल्या असतात.
SR No.034338
Book TitleThe Science of Money Abr Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year
Total Pages100
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy