________________
पैशांचा व्यवहार
अडचणी दूर झाल्या! 'दादा भगवानांचे' नाव घेतले आणि पैसे मिळाले नाही तर ते 'दादा' नव्हेत! पण घरी गेल्यानंतर ही माणसे अशा प्रकाराने 'दादा भगवान'चे नाव घेत नाहीत ना!
लक्ष्मी तर कशी आहे ? कमाई करताना दु:ख, जपून ठेवताना दुःख, रक्षण करतना दुःख, आणि खर्च करताना सुद्धा दुःख. घरात लाख रुपये आले की ते सांभाळून ठेवण्याची काळजी वाटते. कोणत्या बँकेत ते सुरक्षित राहतील, हे बघावे लागते. शिवाय नातेवाईकांना कळले तर लगेच त्यांची धावपळ सुरु. सर्व मित्रमंडळीची धावपळ सुरु, म्हणतील काय की, 'अरे, यार माझ्यावर एवढा सुद्धा विश्वास नाही? मला फक्त दहा हजारच पाहिजे, मग काय? नाईलाजाने द्यावे लागतात. पैसा जास्त असेल तरी दुःख आणि अगदी टंचाई असेल तरी दुःख. तर नॉर्मल असलेलेच बरे, अन्यथा लक्ष्मी वापरताना सुद्धा दुःख होते.
लोकांना तर लक्ष्मी सांभाळताही येत नाही, आणि त्याचा उपभोग घेताही येत नाही. उपभोग घेताना म्हणतील इतके महाग? इतकी महाग वस्तू कशी घ्यायची? अरे, भोगायला मिळते ते भोग की मुकाट्याने ! परंतु उपभोग घेताना सुद्धा दुःख, कमावताना सुद्धा दुःख, कमाई करताना माणसे वैताग आणतात अशा परिस्थितीत कमावायचे, अरे, कित्येक तर उसने दिलेले पैसे परत देतच नाहीत. म्हणजे मिळवतानाही दुःख आणि सांभाळतानाही दुःख. कितीही जपून ठेवले तरी बँकेत पैसा टिकतच नाही ना! बँकेत खात्याचे नावच क्रेडिट आणि डेबिट, पुरण आणि गलन! लक्ष्मी जाते तेव्हा पण फार दुःख देते.
काही माणसे इन्कमटॅक्स गिळून बसलेले असतात. पंचवीस पंचवीस लाख रुपये दाबून बसलेले असतात. पण त्यांना माहित नाही की हे सर्व पैसे जातील. मग इन्कमटॅक्सवाल्याची नोटीस येईल तेव्हा पैसे कोठून काढणार? ही तर निव्वळ फसवणूकच आहे. हे जे लोक फार ऊँच चढतात, त्यांना फार जोखिम! परंतु हे त्यांना समजतच नाही ना! उलट दिवसभर इन्कमटॅक्स कसा वाचवता येईल, याकडेच लक्ष असते. म्हणून तर आम्ही सांगत असतो ना की, ही माणसे तिर्यंच (जनावर) गतीचे रीर्टन तिकिट घेऊन आलेली आहेत.