________________
चमत्कार
धर्मापासून दुरावले हे लोक! म्हणून वैज्ञानिक, खरी रीतच असली पाहिजे की जेणे करून भावना जरी उशिरा बसली पण कायमसाठी टिकून राहील. तो दिखावा तर नाही चालणार. दिखावा किती वर्षे चालेल? पण तरीसुद्धा आपल्या हिंदुस्तानात हे सर्व असेच केलेले आहे. असे ठोकमठोक करूनच दिखावा चालविला. 'असा दिखावा कशासाठी करता? तुम्हाला काय पाहिजे आहे, की ज्यासाठी तुम्ही असा दिखावा करता? तुम्ही कशाचे भिकारी आहात?' असे आपण विचारले पाहिजे. आणि आपल्या 'इथे' तर कसे आहे ? अजिबात पोलम्पोल (दिखावा) नाही ना! म्हणजे असे निर्मळ होईल तेव्हाच हिंदुस्तानाचे दिवस पालटतील!
चमत्काराला नमस्कार करतात ते.........
एक माणूस आम्हाला बडोद्यात सांगू लागला, म्हणाला की, 'दादा, काही चमत्कार करा ना. म्हणजे संपूर्ण जग इथे येईल.' पण मी म्हणालो, 'या जगातील लोक चमत्कार केला म्हणजे नमस्कार करण्यासाठी येतात, पण गायी, म्हशी, मेंढ्या, कुत्रे चमत्काराला नमस्कार करतात का? फक्त हे मनुष्यच इथे येतील. आणि जे चमत्काराला नमस्कार करतात ते तर गायीम्हशींपेक्षाही निकामी आहेत! नाहीतर इथे आम्ही फक्त एकच साधना केली ना, तर हे टेबल सारखे उड्याच मारत राहील. पण त्यामुळे मग सगळेच लोक येथे जमा होतील, तेव्हा आपण त्यांना काय उत्तर देऊ? आणि जमावाचे करायचे तरी काय? यामधून निवडून-निवडून-निवडून मोती, खरे हिरे काढून घ्यायचे आहेत! ह्या दुसऱ्या सर्व कचऱ्याचे काय करायचे? नाहीतर हे टेबल चारही पायांनी उड्या मारेल, आपोआप, काही यंत्र ठेवल्याशिवाय उड्या मारु शकेल असे आहे, हे सायन्स आहे. आजचे सायन्टिस्ट नाही समजू शकणार की कोणते सायन्स आहे हे!! हे 'रियल सायन्स' आहे. आणि त्या लोकांचे ते रिलेटिव सायन्स आहे. आता हे त्यांना कसे काय समजणार बिचाऱ्यांना?
म्हणून 'दादा' चमत्कार करतात असे लोकांनी ऐकले ना तर सारा उलटा माल घुसेल, खोटा माल सगळाच इथे येईल! हा चमत्कार पाहण्यासाठी जो बुद्धिवंत वर्ग आहे ना, तो तर इथे येणारच नाही. कोणता