________________
चमत्कार
तुम्ही तिथे ठेवले असतील ना, मग तुम्ही म्हटले की साहेब महिन्याच्या मुदतीने मी ठेवले आहेत, तर मला परत मिळतील का? तेव्हा तो म्हणेल, 'महिना पूर्ण झाल्यावर घेऊन जा.' म्हणजे महिना पूर्ण होताच सगळे पैसे परत करतो. पण मग दुसरे लोकही पैसे ठेवतात का त्याच्याकडे ? का? लोकांना हे माहित आहे की सध्या लोक पैसे दाबून ठेवतात पण तरी या शेठकडे पैसे ठेवतात, त्याचे काय कारण? तर त्याने सिद्धी प्राप्त केलेली आहे. आता स्वतःजवळ सिद्धी असताना सुद्धा पैसे दाबून ठेवत नाही, सिद्धी वापरत नाही, या सिद्धीचा दुरुपयोग करत नाही आणि एकदाही जरी दुरुपयोग केला तर? तर ती सिद्धी वापरली गेली. मग त्याला कोणी पैसे उधार देत नाही, बाप सुद्धा देत नाही. म्हणजे ह्या दुसऱ्या सर्व सिद्धी सुद्धा याच प्रकारच्या आहेत. या उदाहरणावरुन मी तुम्हाला 'सिमिली' (उपमा)
दिली.
आता तो शेठ बाजारातून दहा लाख रुपये गोळा करतो आणि घेऊन येतो. मग जेव्हा मुदत संपते तेव्हा सर्वांना पैसे परत करतो, आणि वेळेवर देतो म्हणून कधी पंचवीस लाख रुपये पाहिजे असतील तर त्याच्याकडे सिद्धी असेल की नाही?
प्रश्नकर्ता : पण यास सिद्धी म्हणता येणार नाही. ही तर नॉर्मल पॉवरची गोष्ट झाली, व्यवहाराची गोष्ट झाली आणि सिद्धी तर एब्नॉर्मल पॉवरची गोष्ट आहे.
दादाश्री : हो, पण ती सिद्धी सुद्धा यासारखीच आहे. माणसाने काही पॉवर वापरली नसेल ना, तर हे उपयोगात येते. पण जर पॉवर वापरली तर सिद्धी नष्ट होऊन जाते! म्हणजे तो मनुष्य सहजपणे हिंडताफिरता पंचवीस लाख रुपये जमा करू शकतो, तेव्हा आपल्याला हे नाही का समजणार की ओहोहो, किती सिद्धी आहे त्याच्याजवळ ! किती सिद्धी प्राप्त केली आहे!
प्राप्त होतात अशा प्रकारे सिद्धी आणि एक माणूस स्वत:ची काही ठेव(पैसे) दुसऱ्यांकडे ठेवण्यासाठी फिरत असेल तरीही लोक म्हणतील, 'नाही, भाऊ, सध्या आम्ही कुणाचे