SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 45
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३६ (१२) आत्मदृष्टि झाल्यानंतर आत्मप्राप्तिचे लक्षण ! मी कोण आहे ? 'ज्ञान' मिळण्याआधी आपण चन्दुभाई होता आणि आता ज्ञान घेतल्यानंतर शुद्धात्मा झालात, तर अनुभवात काही फरक वाटतो का? प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : 'मी शुद्धात्मा आहे' हे भान आपल्याला किती वेळ राहते? प्रश्नकर्ता : एकांतात एकटे बसलेले असतो तेव्हा. दादाश्री : हो. मग कुठला भाव राहतो? आपल्याला 'मी चन्दुभाई आहे' असा भाव होतो कधी ? आपल्याला रियलमध्ये 'मी चन्दुभाई आहे' हा भाव कधीतरी झाला होता का ? प्रश्नकर्ता : ज्ञान घेतल्यानंतर नाही झाला. राहात. दादाश्री : मग आपण शुद्धात्माच आहात. मनुष्याला एकच भाव राहू शकतो. अर्थात् ‘मी शुद्धात्मा आहे' हे आपल्याला निरंतर राहतेच. प्रश्नकर्ता : पण कित्येक वेळेला व्यवहारात शुद्धात्माचे भान नाही दादाश्री : तर 'मी चन्दुभाई आहे' हे ध्यानात राहते? तीन तास शुद्धात्माचे ध्यान नाही राहत आणि तीन तासानंतर विचारले. आपण चन्दुभाई आहात कि शुद्धात्मा आहात? तेव्हा काय सांगाल ? प्रश्नकर्ता : शुद्धात्मा. दादाश्री : म्हणजे ते ध्यान होते च तेव्हा. एक शेठ आहे, त्याने दारू प्यायली, त्या वेळेस ध्यान सर्व निघून जाईल, पण दारूची नशा उतरल्यानंतर?
SR No.030125
Book TitleMi Kon Mahe
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2014
Total Pages62
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy