SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 95
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ७० : आराधना कथाकोष अहो धनपतिचा नंदन । शाम असे वायसा पाहूने । त्या न सुंदर वदती जन । जैसा दिसे कृष्ण द्वारकेचा ।।१३०।। तदा चालत चालत क्षिती । नदी वन उल्लंघिले किती। पावला सिंहपुराप्रति । जेथे श्रीभूति मंत्री असे ।।१३१।। मग चित्ति करी विचार । प्रातः दिनेश उगवल्यावर । मंत्रिगृहि जावोनि सत्वर । आनावे सुंदर पंचरत्न ।।१३२।। मग सुखे दुखे क्रमलि निसी । प्रातउंठोनि लवलाहेसि । पावला मंत्रिचे मंदिरासी । तो होता स्वसदसि बैसला ॥१३३॥ दुरोनि पाहोनि कुमरात । वदतसे सभाजनात । म्हने मी कथितो तुम्हात । ते सत्य चित्तात मानिजे ।।१३४॥ कोन्ही येक भिखारी । येवोनिया क्षणाभीतरि । मला याचना करीलथोरि । मद्रत्न सत्वरि पंच देइजे ॥१३५।। याचना करील वेळोवेळ । ऐसी मजवरि येइल आळ । पुढे होणार जे सकळ । ते पूर्वी प्रांजळ कळले मज ।।१३६।। जो सत्यवचनि रत असे । त्यात होनार कळतसे । अलीक वदत महत्त्वनासे । कौनासि नसे तविश्वास ॥१३७।। ऐसे वदताचि वचन । तत्क्षणि येवोनि श्रेष्टिनंदन । याचिता झाला पंचरत्न । श्रीभूति कारण सत्वरी ।।१३८।। पुनःपुन्हा वदे त्यासि । स्वामि म्या ठेविले तुजपासी । ते पंचरत्न मनोल्हासी । द्यावे मजसि शीघ्रत्वया ।।१३९।। तदा मंत्रि वदे जनाप्रति । म्या पूर्वि कथिले जे उक्ति । ते मद्वाक्याचि प्रचीति । तुमचे चित्ति कैसि भासे ।।१४०।। २५. काक. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy