________________
प्रसंग पाचवा : ६९
उक्तदुहा । मन चित्य मानवा ससा चिते रान । मासाचिते खोलपानि । कर्तार करे सो आन ॥१२०॥ सिधुमध्ये येता जलयान | देवसंजोगे करोन । तत्क्षणि गेले बुडोन । यथा पापीजन भवजलि ॥१२१।। तत्क्षणि तो समुद्रदत्त । जपता मंत्र अपराजित । येक पटल्या" टोपलि त्यात । यथा सम्यक्त मानवासि ।।१२२।। बैसोनि त्या पटलीवरी । मुखी परमेष्टि" नामोच्चारी । वायोप्रयोगे चालत सत्वरि । पैले तीरि येत झाला ।।१२३।। मग तेथोनिया चालिला । पदरि नसे अधेला। भिक्षाटन करित चालिला। फिरु लागला पादचारे ।।१२४।। मलीन दिसति वसन । शरीरि न दिसे आभूषण । जगी दिसे कायाहीन । स्नान लेपन रहित ।।१२५।। चालत चालता दिनांतरी । पीडित होय शरीरि । कंटक वेधति पदांतरि । यथा वैरी प्राग्भवीचे ॥१२६।। ज्यासि अशुभ कर्म नाडे । त्यावरि नाना संकट पडे । जेथे तेथे वाइट घडे । दुःखावर पडे होत असे ।।१२७।। उक्तंच काव्य । खल्वाटे सिरसे दिनेश्वर करि अत्यंत पै तापला । वांछि शीतल देश दैवगतिने तालातलि तिष्टला ॥ तो मून फल पाप्त होउनि महाघोषान्वटा भंगला। जेथे जाय सवेचि संकट महा लाधे अदैवागला ॥१२८।। दरीद्र आलिया प्राणियासी । कोन्हि न पश्यति त्यासी । वाक्य न वदति सुमानसो । जनरीति ऐसीच असे ।।१२९।।
२१. समुद्र. २२. जहाज. २३. पारी. २४. नौकारमंत्र.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org