________________
संग त्रैचाळीसावा : ५६७
ततो भावे गुरूची सेवा । जिनधर्म मनी धरावा । पवित्र नरदेहे करावा । धर्म आचरावा मोक्षमार्ग ॥८०॥ श्लोक:-स जयतु जिनदेव: सर्वदेवेंद्रवंद्यस्त्रिभुवनसुखकर्ता विश्वसंदेहहर्ता ।। स्थिरतरगुरुदत्तः प्राप्तनित्यस्वभावो। मम दिशतु सुखानि श्रीप्रभाचंद्रदेवः ॥८१।।
कथा गुरुदत्त ६९ श्लोक:-चंचत्सत्केवलज्ञानलोचनं श्रीजिनेश्वरं । नत्वा चिलाइतपुत्रस्य चरित्रं रचयाम्यहं ।।८२॥ देवगुरू वंदोनी भावे । माय सारजे प्रसन्न व्हावे । ज्ञानकथा तप वैभव । सावध व्हावे श्रोता ज्ञानी ॥८३॥ राजगृह असे विस्तीर्ण । उपश्रेणिक पुण्यवान । माया अश्वावरी बैसोन । गेला अरण्य पाहावया ॥८४॥ वारू गेला आकाशपंथ । नृपेंद्र पडला वनात । भीम भिल्ल होता तेथ । नेला स्वस्थ आपुले धामी ।।८५।। त्याची कन्या तिलकसुंदर । सुश्रूषा करी मनोहर । पाहोनी मदनाचा भर । विरह थोर व्यापला तो ॥८६॥ भिल्लासी म्हणे हे सुंदरी । आम्हासी द्यावी वो झडकरी । कन्यासुता राज्यनगरी । घाल तरी करावे लग्न ||८७|| राजा वदे सत्यवचन । तिलकापुत्र राजी स्थापीन । रायाचे लग्न आनंदान । आले सदन राज्यगृही ॥८८॥ पूर्वपुण्य भोग भोगिता । गर्भिणी जाली भिल्लसुता । पुत्र जाला स्वरूपवंता । माता पिता बहु आनंद ||८९।। बीजचंद्र वाढे तो निसी । प्रोढ देखोनिया पुत्रासी ।
..... .... । चिलाईत नामासी दिधले ॥९०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org