SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 414
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग अट्ठावीसावां । ३८९ रक्ताराणी तृप्त जालीते | सावधपन चालली ते । यमुनानदी तटाकाते । वृक्षछायाते स्थिरावली ॥ ६७ ॥ येथे स्वयंपाक करोन । सामुग्री आनितो ग्रामातून । वृक्षातळी निद्राकरन । करि गमन ग्रामपंथे ॥६८॥ वारीयंत्र बागात फिरे । पंगु बैसलासे तो वरे । गायन करितसे सुस्वरे । ऐकोनि सुंदरे लुब्धली ॥६९॥ गायन महामनोहर | लुब्ध जाली ते कामातुर । जवळ जावोनी सुंदर । मज अंगीकार करा म्हणे ॥७०॥ ते ऐकोनिया पंगु बोले । तुझा भ्रतार आता येईल । तो माझा गे प्राण घेईल । स्त्रियाचे बोले लागु नये ॥७१॥ राणी म्हणे तयाचे भय । तुम्ही काहीच धरू नये । आता मी सांगते ते सोय । धरा हृदइ तुम्ही एक ॥७२॥ आता तुम्ही संग करावा । भ्रतार येईल माझा जेव्हा । तुम्ही चित्ती धीर धरावा । तमाशा पाहावा एकचित्ते ||७३|| ते रांड रातलि तयासी । न जाने गति होईल कैसी । मरण इच्छी भ्रतारासी । पापाचि रासी नरकगामी ||७४॥ विषयलुब्ध जा स्त्रिया । दुराचारिणी पापी प्रिया । कौठाल्याति न करोनिया । फुल आनोनीया ठेविली ॥७५॥ पंगपासी ताट घेवोन । तव राये आनील भोजन । दोघे बैसली ते प्रीतीन । करिती भोजन यथारुचि ॥ ७६ ॥ मग ते स्त्रिया रोदन करी । कपट धरोनिया अंतरी । राजा म्हणतसे हे सुंदरी । दुःख अंतरी कासियाचे ॥ ७७ ॥ रक्ता राणी रायासी बोले । राजमहाली सुख भोगिले । गळाहार पुष्पाचे केले । ते मज आठवले प्राणपति ॥ ७८ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy