SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 413
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३८८ । आराधना कथाकोष नरदेहासी येवोन । नृपा न सोडि घडि एक । न जाने विवेकाविवेक । विषयषोक दिवाराती ॥५५॥ प्रधान सांगता विचार । त्याचा करिति ते तिरस्कार । पुत्रा नेउ देती समोर । जाले जर्जर प्रजा सर्व ॥५६॥ सेटे महाजन मिळोनी । प्रधानासी बोलाउनी। पुत्रास राजी बैसउनी । द्यावे काढोनि दोघा जना ।।५७॥ हे धर्मकर्माचे विरहित । न्यायनीति नाहि जयात । यासि ठेविता जग फजित । तुम्हा आम्हात बरे नाही ॥५८॥ जयसेन पुत्र बोलाविला । राजपदी तो बसविला । राजनीति करू लागला । धाक लाविला वैयासी पै ॥५९॥ राजा राणी दोघे जन । वनवासा दिल्ही काढोन । धिग् धिग् कामांधजन । पापपुण्य न जानती ते ॥६०॥ तदा ते दोघ मदोन्मत्त । वनवासी कामसक्त । तेव्हा ते जाती क्षुधाक्रान्त । रायासी मागत भोजन ॥६१॥ क्षुधारोग जाला उत्पन्न । आचार विचार जाला शून्य । म्हने कंदमूळ द्या आनून । येथे अरण्य काय देउ ॥६२॥ काही तरी वो आणा वेगी। भूक प्रळयीचीच आगी। विषयासक्त स्त्रियेलागी । विचार वेगी करीतसे ॥६३॥ मोहोत्पन्न हृदयकमळा । मांडि चिरोनि मांसगोळा । संस्कार करोनि निर्मळा । भोजन रसाळा करि स्त्रीय ॥६४॥ क्षुधाअग्नी तृप्तता जाली । तृषा अग्नी ते प्रजळली । पानी पानी बोले मंजुळी । राव कळवळी अंतरी ॥६५॥ म्हणे अरण्य कोकस्तनी । कोठे न येथे दिसे पानी। डावि बाहुसिर तोडोनि । काढिल पानी प्राशन केले ॥६६॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy