SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 412
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव नाही. पण ह्यात तपाच्या अनुषंगाने, मनुष्यगतीतूनच मोक्ष आहे. ह्या सिद्धांताप्रमाणे मुनिअवस्थेपासून तो मोक्षसाधक ध्यानाचाच विचार आहे. त्यामुळे प्रसंगोचित अशी ही विशेष उत्कृष्ट ध्यानव्याख्या आहे. सर्व प्रकारच्या ध्यानांचा अंतर्भाव होणारी सामान्य व्याख्या नाही असे वाटते, पण उत्तम संहनन नसणाऱ्यालाही कमी कालमर्यादा असणारे ध्यान होऊ शकते. क्षायोपशमिक ज्ञानभावाच्या उपयोगाची एकाच अग्रावर असणारी स्थिरता म्हणजे ध्यान हा अर्थ ह्याच व्याख्येवरून निघतो. म्हणून मानली तर विशेष व मानली तर सामान्य ह्या दोन्ही व्याख्या ह्यात अंतर्भूत आहेत. प्रथम ध्यानाचे प्रशस्त अप्रशस्त भेद करून, अप्रशस्त ध्यान म्हणजे आर्त व रौद्र व प्रशस्त म्हणजे धर्म्य व शुक्ल ध्यान सांगितले आहे. (१) आर्त म्हणजे पीडा, दुःख त्यात जे उत्पन्न होते ते आर्त. अनिष्ट संयोग, इष्टवियोग, रोगादिकांच्या पीडेमुळे व चौथे भोगांत निदानामुळे होते. हे आर्तध्यान एक ते सहा गुणस्थानापर्यंत असते एक ते पाच पर्यंत पहिले चार व सहाव्यात निदानरहित तीन आर्त ध्यान असतात. कृष्ण, नील, कापोत ह्या अशुभ लेश्येच्या सामर्थ्याने होतात. निसर्गतः स्वयमेव उत्पन्न होते. काळ अंतर्मुहूर्त, त्यानंतर निश्चित ज्ञेयांतर असते. प्रमादि, भित्रे उद्धांत, आळशी, कलहप्रिय असे आर्तध्यानी असतात. तिथंचगती हे फळ होय. रुद्र, क्रूर आशयापासून उत्पन्न होणारे रौद्रध्यान हिंसानंद, चौर्यानंद, मृषानंद व संरक्षणानंद हे चार प्रकार आहेत. प्रामुख्याने कृष्णलेश्या असते व नरकगती हे फल होय. सामान्यपणे कृष्ण, नील, कापोत ह्या तीन लेश्या असतात व तिर्यंचगती हेही फल असते. पाच गुणस्थानापर्यंत स्वामी असतात. पाचव्या गुणस्थानात अशुभ लेश्या व नरकायचा बंध नाही. पण हे वर्णन मिथ्यादृष्टीच्या प्राधान्याने केलेले आहे. सम्यग्दृष्टीच्या अपेक्षेने एवढे रुद्र परिणाम नरकफलाला देणारे नाहीत. क्रूरता, कठोरता, फसवणूक हे रौद्रध्यानीचे बाह्य चिन्ह आहेत. काल अंतर्मुहूर्त आहे. स्वयमेव उत्पन्न होणारे आहेत. ही दोन्हीही ध्याने पूर्वकर्मामुळे मुनींना देखील होतात. तेव्हा हे दोन्हीही अप्रशस्त ध्यान हेय आहेत. २०७ आर्तध्यानाचा विषय दुःखपीडा तर रौद्र ध्यानाचा पाच पापात हर्षरूप रुद्र विषय. दोन्ही ध्यान क्षायोपशमिक भाव आहेत. दोन्हींचा काल जास्तीत जास्त अन्तर्मुहूर्त आहे. आर्तध्यान स्वामीचे एक ते सहा गुणस्थानापर्यंत तर रौद्र स्वामी एक ते पाच पर्यंत. आर्तध्यानात कृष्ण, नील, कापोत ह्या ३ लेश्येचे अवलंबन तर रौद्र ध्यानात प्रामुख्याने फक्त कृष्ण लेश्येचे अवलंबन. आर्ताचे फल तिर्यंचगति तर रौद्राचे फल नरकगति आहेत. दोन्ही स्वयमेव अनादि संस्काराने उत्पन्न होतात. त्यानंतर धर्मध्यानाचे वर्णन आहे. धर्मध्यानापूर्वीची भूमिका तयार झाल्यावरच ते होऊ शकते. प्रशम भावांचे अवलम्बन, इन्द्रिय व मन स्ववश, कामभोगामध्ये निरिच्छ व विरक्त झाल्यावर धर्मध्यानाचा विचार. ह्या धर्मध्यानाचा ध्याता ज्ञानवैराग्यसंपन्न संवृत, स्थिराशयी, मुमुक्षु, उद्यमी, शांत व धैर्यवान असावा. प्रथम धर्मध्यानाच्या पोषक चार भावना सांगितल्या आहेत. मित्राविषयी अनुरागाने सुरवात मैत्रीपोषक रस, चुका झाल्यावर दुरुस्ती, स्खलन झाल्यास तडजोड अशी हितैषी भावना असते. त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणी समभावनेने अनुरागपूर्वक हितैषी भावना म्हणजे मैत्री. सहानुभूतीने वा दयेने, दुःखाने पीडित जिवांचे दुःख दूर करणारी बुद्धि करुणा, गुणीजनात प्रमोद व विपरीताचरण करणाऱ्यांच्या Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy