SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 411
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २०६ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ ध्यानपात्र मुनींचे वर्णन आहे. ज्ञानपिपासु, मैत्री, प्रमोद, कारुण्य व माध्यस्थ ह्या चतुर्भावनेने मनशुद्धी करणारा निस्पृह कषाय व इंद्रियविजयी ध्यान सिद्ध करू शकतात. रत्नत्रय शुद्धिपूर्वक ध्यान मानले असल्यामुळे तत्त्वरुची म्हणजे सम्यक्त्व, तत्त्वप्रख्यापक ज्ञान व पापक्रिया निवृत्ती चारित्र होय. त्यांच्या भेद प्रभेदांचे व गुणदोष विचारपूर्वक विवरण आहे. सम्यक्चारित्राचे वर्णन करताना पाच महाव्रताचे वर्णन आहे. अहिंसाणुव्रताचे तर फारच सूक्ष्म व विस्तृत विवेचन केले आहे. सत्यानुव्रतात, हित, मित, प्रिय, सदय धर्मरक्षक वचन हवे, पण, कठोर, बकवाद सदोष मर्मभेदक नको. ब्रम्हचर्य महाव्रताचे फार गहन व विस्तृत वर्णन आहे. मैथुन प्रकार, काम स्त्री दोष व गुणवर्णन, स्त्रीसंसर्ग व वृद्धसेवावर्णन आहे. परिग्रह त्यागात अन्तरंग बहिरंग परिग्रहाचा उल्लेख, २५ भावना, पाच समिति, तीन गुप्ति ह्यांचे संक्षिप्त वर्णन आहे. क्रोधादिक कषाय चारित्र व ध्यानघातक असल्यामुळे त्याचेही वर्णन आहे. ह्याप्रमाणे ध्यानाची पार्श्वभूमी तयार होण्याकरता आवश्यक त्या सर्व कर्मांची सिद्धि झाल्यावर आत्मतत्व जाणण्याची पात्रता येते. म्हणून त्या काळात प्रसिद्ध शिव, काम व गरुड ह्या ध्येयतत्त्वाचे नव्या अर्थाने आत्म्यातच अंतर्भाव करून वर्णन फारच सुंदर केले आहे. जनमनाला न दुखवित प्रच्छन्नपणे आघात करून नवीन मार्गदर्शन करून त्याच नावाखाली ध्येय तत्त्व बदलविले आहे. ध्यानसाधनेसाठी मनोरोध सांगून, मनोव्यापाराचे चित्रण करून अन्य मतांनी मानलेल्या आठ ध्यानांगाचा उल्लेख केला व निजरूपात स्थिरता हेच ध्यान सांगून मनाला वीतराग, वीतद्वेष व वीतमोह करण्याची प्रेरणा देऊन रागी व वीतरागीमुळे अनुक्रमे बंध मोक्ष पद्धति आहे हे सांगून साम्यभाव आचरायला सांगितला आहे. साम्यभावपरं ध्यानं प्रणीतं विश्वदर्शिभिः । तस्यैव व्यक्तये नूनं मन्येयं शास्त्रविस्तरः ॥ साम्य भावामुळे अशुभांचा जसा हेयपणा तसाच शुभहि हेय ही बुद्धि निर्माण होऊन शुभातच धर्म समजणाऱ्या विचारातून व्यक्ति वर येते व त्यामुळे ध्यानसन्मुख अवस्था म्हणजेच साम्यभाव असे समजायला काही हरकत नाही. व हा साम्यभाव निश्चल व्हावा हाच ध्यानाचा हेतु आहे. ध्यान व समभाव दोन्हीही एकमेकांना आधार आहेत. वास्तविक ज्ञान वा ध्यान प्रशस्तच आहेत. पण आमचे अज्ञान ज्ञानाला मोहाकरता व ध्यानाला नरकाकरता योजते म्हणून अप्रशस्त ध्यान हेय आहे असे सांगून मोक्षाकरिता प्रयोजनभूत असणारी ध्यानव्याख्या केली आहे. शिष्यांना उपदेश करताना प्रथम उत्कृष्ट तत्त्वाचाच उपदेश करायचा, पण शिष्याच्या बलहीनतेमुळे त्यातून मार्ग काढण्याकरता क्रमाक्रमाने खालून उत्कृष्ट तत्त्व सांगायचे ही जैनचार्यांची पद्धती शुभचंद्रांनीही स्वीकारली होती. उत्कृष्ट संहनन असणाऱ्या व्यक्तीचे एकाच अग्रावर मनाला जे निरूद्ध करणे ते ध्यान. त्याचा जास्तीत जास्त काल अन्तर्मुहूर्त आहे. एकाच ध्येयावर स्थिर असणारे ते ध्यान व अनेक अर्थाचा विचार म्हणजे अनुप्रेक्षा. ह्या ध्यानव्याख्येत सर्व प्रकारच्या ध्यानाचा व ध्यानस्वामींचा अंतर्भाव होऊ शकत नाही. फक्त बुद्धिपूर्वक ध्यानाचा व संज्ञी जिवांचा विचार ह्यात येतो पण अबुद्धिपूर्वक. (मनव्यतिरिक्त) प्रत्येक इन्द्रियांनी होणारे अप्रशस्त ध्यान एकेन्द्रियापासून असंज्ञी पंचेन्द्रियापर्यंत असणारे ध्यानस्वामी ह्यात समाविष्ट होऊ शकत Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy