SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 171
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १४२ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ दर्शन करना हो तो जब महाराज नवग्रह देवताओं से दूर हो उसी समय अच्छा हो पाता है।" पंडितजींचे वाक्य गूढच होते. खुलासा हवा म्हणताना पंडितजींनी श्रींच्या आवतीभोवती भक्त (?) म्हणून गोळा झालेल्या परंतु महाराजांचा त्याग व तपस्यावैभव जणू आपल्या मालकीची खाजगी इस्टेट आहे अशा कोत्या समजुतीने इतरांना वेळी अवेळी मज्जाव करणाऱ्या सात आठ ग्रहांची शीघ्रतेने नावे सांगितली व पंडितजी थांबले. 'पंडितजी साहब ! नववी देवता राहिली की!' यावर लगोलग ते म्हणाले-'नववी ग्रहदेवता पूर्वग्रह' आहे. कोणाही पुरुषाचे अथवा कोणत्याही तत्त्वाचे यथार्थ दर्शन किंवा आकलन व्हावे असे वाटत असले तर त्या विषयाची कुत्सित किंवा अन्यथा धारणा अगोदर सोडली पाहिजे. कदान काठोकाठ भरलेल्या पात्रामध्ये पक्वान्न कसे बरे सामावणार ? त्याचप्रमाणे संकुचित धारणा, कुविचार व दुर्भावना यांनी बरबटलेल्या मनामध्ये सत्तत्त्वाचे यथार्थ आकलन कसे होणार ? साध्या माणसाची कल्पना येण्यासाठी जर दिलसफाई असावी लागते तर महापुरुषाच्या मोठेपणाची कल्पना येण्यासाठी केव्हाही मनाची स्वच्छता असणे जरुरीचेच राहाणार. २. महापुरुषाचे थोर अन्तःकरण महापुरुषाच्या मोठेपणाचे मापक त्याचे मोठे मन असते. लोककल्याणाच्या जागृत भावनांनी ते सदैव ओतप्रोत असते. सम्मेदशिखराच्या महाविहारास प्रारंभ झाल्यावर संघ अक्कलकोट ते गुंजोटीपर्यंत विहार करीत असता दर मुक्कामावर तळ पडल्यानंतर आचार्यश्री सर्वप्रथम संघपति व स्व. श्री. जीनगौडा पाटील यांना सर्व संघाचे कुशल विचारीत व सोयी गैरसोयीसंबंधी आस्थेवाईकपणे बारकाईने चौकशी करूनच संध्याकाळचे सामायिकास बसत असत. आपल्या निमित्ताने कुणासही त्रास होऊ नये याकरिता आत्मकल्याणासाठी सदैव जागृत असलेले श्रींचे थोर मन लोककल्याणासाठीही तितकेच सावध आहे हे प्रत्यक्षात पहावयास मिळाले. 'साधुसंतांचा श्वास स्वतःसाठी तर निःश्वास जगतासाठी असतो' म्हणतात याची मनोमय साक्ष पटली. ३. धर्मासंबंधी आस्था हवी कोन्नूर (गोकाक रोड) येथे श्रींचा चातुर्मास होता. भाद्रपद शुद्ध सप्तमीचा दिवस असावा. शिक्षक एक शाळेची २५ मुले घेऊन दर्शनासाठी आले होते. सोलापूरकर ब्र. जीवराजभाईंनी मुलांची परीक्षा घेतली. मुलांना साधा णमोकार मंत्रही न आल्यामुळे जमलेल्यांना अत्यंत वाईट वाटले. महाराजश्रींनी चौकशीस प्रेमाने सुरवात केली. शिक्षक एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे उभे होते. हेडमास्तर कोण आहेत ? कुठे आहेत या प्रश्नाला 'बाहेरच उभे आहेत, ते मुसलमान आहेत' असे समोर आलेल्या शिक्षकाने उत्तर दिले. त्यांना आत बोलविण्यात आले. त्यांनीही मोठ्या अदबीने श्रींना साष्टांग दण्डवत घातले. आचार्यश्रींनी अत्यंत प्रेमाने दोन गोष्टी सांगितल्या. धर्माची तत्त्वे, धर्मतंत्र व नीतितत्त्वे ही सर्वांनाच अवगत पाहिजेत, आपणास ज्याप्रमाणे आपल्या धर्माविषयी आस्था आहे त्याप्रमाणेच आपण या सर्वांच्या धर्मज्ञानाविषयी Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy