SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 170
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ स्मृति - मंजूषा १४१ या मंदिरप्रवेश प्रकरणी अकलूज गावी दिगंबर जैन मंदिरात हरिजनांचा प्रवेश झाला. तो असा : काही हरिजनांना घेऊन सोलापुरचे कलेक्टर अकलूज गावातील दिगम्बर जैन मंदिराकडे पोहोचले. मंदिराचे दरवाजाला कुलुप लावलेले होते, ते कलेक्टर साहेबांनी तोडविले. याप्रमाणे आपला अधिकार दाखवून हरिजनांचा जैन मंदिरात प्रवेश करविला. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून हे प्रकरण मुंबईच्या मुख्य न्यायाधीशांकडे जैन समाजाने नेले. त्या वेळचे मुख्य न्यायाधीश श्री अब्दुलकरिम छागला होते. त्यांच्याकडे व न्यायाधीश गजेन्द्रगडकर यांचेकडे जैन ग्रंथ हरिजनाच्या मन्दिर प्रवेशाला प्रतिकूल आहेत हे त्यांना समजावे म्हणून हस्तलिखित ग्रंथ तेथे नेले होते व ते कोर्टात उच्चस्थानी विराजमान केले होते आणि मुद्रित प्रमाणांची पुस्तके आधीच न्यायाधीशाकडे पोहोचविली होती. वादविवादानंतर ता. २४/७ ५१ या दिवशी श्री. छागला आणि श्री. गजेन्द्रगडकर यांनी असा निर्णय दिला - Harijanas have no right to entry in Jain Temples as they are not Hindu Temples. याचा अभिप्राय असा की, हरिजनांना जैन मंदिरात प्रवेशाचा अधिकार नाही कारण ती हिंदू मंदिरे नाहीत. (सीव्हिल अप्लीकेशन नं. ९१ आफ १९५१) यावरून निष्कर्ष हा निघतो, जेव्हा धर्मावर संकट येते तेव्हा धर्मगुरूंनी स्वस्थ बसू नये. जैन धर्मात श्रावक श्रमणांचे एक संयुक्त धार्मिक संगठन असावयास पाहिजे. या संघटनेसच चतुःसंघ असे नाव आहे. यात मुनिआर्यिका हा त्यागीवर्ग आहे आणि श्रावकश्राविका हा गृहीवर्ग आहे. हे दोन्ही मिळून चतुःसंघ होतो. जैनधर्माच्या अस्तित्वासाठी या दोघांची आवश्यकता आहे. त्यागीवर्ग गुरुस्थानी आहे. त्यांनी गृहस्थांना मार्गनिर्देश करीत राहिले पाहिजे. ज्ञान आणि चारित्राच्या अभावी मार्ग दाखविणे शक्य होणार नाही. म्हणून गुरू ज्ञानी व चारित्रसंपन्न असला पाहिजे. आचार्य महाराज ज्ञानी व चारित्रवान् असल्यामुळे त्यांनी हे धर्मसंकट कायमचे दूर केले. यास्तव त्यांच्या चरणांना त्रिकाळ वंदन करितो. काही आठवणी ब्र. माणिकचंद्र चवरे, न्यायतीर्थ, कारंजा. परमपूज्य आचार्यश्रींचे जीवन जितके अध्यात्मरसाने परिपूर्ण तितकेच समुचित लोकव्यवहार, समयसूचकता व निर्मल नी आल्हाददायी विनोदरसाने ओथंबलेले होते. त्यांच्या पावन सान्निध्यात राहाण्याचे वा प्रसंगोपात्त येण्याचे सद्भाग्य ज्यांना लाभले त्या अनेकांना विविध प्रसंगातून हे अनुभवास आले असेल. - त्यातले काही अनुभव येथे देत आहोत. १. खरे दर्शन हवे तर मूर्ती नवग्रहाने रहित असावी नांदगावी ( जि. नाशिक ) आचार्यश्रींचा मुक्काम असताना स्व. पं. देवकीनंदजी भावभक्तिपूर्वक मनःपूत दर्शन करून परत आले होते. चर्चा सुरू असता पंडितजी म्हणाले, ' महाराज का असली Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.012022
Book TitleAcharya Shantisagar Janma Shatabdi Mahotsav Smruti Granth
Original Sutra AuthorN/A
AuthorJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
PublisherJinwani Jirnoddharak Sanstha Faltan
Publication Year
Total Pages566
LanguageHindi, English, Marathi
ClassificationSmruti_Granth & Articles
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy