SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 56
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र बंध विनिर्मुक्त होत असतील. याप्रमाणे पर्यायांत फरक असला तरी मूळस्वरूपात निश्चितताच आहे. मुमुक्ष जीवाने मिथ्यात्वाचा त्याग करून सम्यक्त्व आदरावे व मोक्षसंपदा मिळविण्यासाठी पौगलिक संपदा सोडावी हे योग्य आहे. पण पौगलिक संपदेच्या मोहांतून व मिथ्यात्वांतून प्रत्येक जीव जातच असतो हे ओळखल्यावर कोणाचा तिरस्कार करावयाचा ? कीव मात्र करता येईल व इतिहासांतील वाईट गोष्टी जाणण्याचा हाच उद्देश आहे. असो. जी गोष्ट धार्मिक बावतींत तचि सामाजिक बाबतीतहि खरी आहे. लोभ, क्रोध, मान, माया वगरे कषायांनी पीडित होऊन जीव अनेक भेद माजवीत उलाढाली करीत राहणारच. प्रत्येक जीवाचा हा इतिहास कोठपर्यंत वर्णावा ? पण कषायविनिर्मुक्त व शेवटी मुखी होतो हा सिद्धान्त जाणण्यासाठीच त्या इतिहासाच्या अनुभवाची जरूरी आहे व म्हणूनच तेवढ्यापुरता इतिहासहि हवा असतो. संसारांत सुख दुःख हे ठरलेलेच. ही गोष्ट न विसरतां कित्येक कटी होतात, कित्येक ते ओळखून सुखदुःख मानण्याचे सोडतात. पण या दोन्ही त-हेचे लोक अनादिकालापासून या जगांत गडबड माजवीत आहेतच. जाणूनबुजूनीह कष्टी होणारे जीवहि असंख्य आहेत. त्यामुळे होणान्या सामाजिक घडामोडी सर्वकाळी सारख्याच. राजकीय बाबतीत हे सर्वकाळी सारखेच अनुभव आलेले आहेत. राजाराजांच्या चढाओढीत असंख्य जीवांची हत्या, धनाचा अपव्यय व काल हानि झालेली आहे. ही गोष्ट वाईट असे समजून अनेक राजे गुण्यागोविंदानहि नांदलेले आहेत. राजसत्ता, लोकसत्ता, सरदारसत्ता व प्रधानसत्ता वैगरे अनेक त-हेच्या राज्यपद्धति निरनिराळ्या काळी होऊन गेल्या. राजा, लोक, सरदार व प्रधान सज्जन असले म्हणजे प्रजेला सुख लाभते व दुर्जन असले की, प्रजेवर जुलूम गुदरतो असाच अनुभव आहे. म्हणून सज्जनसत्ता हाच सर्वश्रेष्ठ होय. वरील तन्हेच्या निरनिराळपा राज्यपद्धति प्राचीन काळीहि वेळोवेळी होऊन गेलेल्या आहेत. अनेक मदोन्मत्त राजे होऊन गेले, त्यांनी पुष्कळ डामडौल केला पण सारेच नश्वर. कांही सत्ताधा-यांनी धर्मप्रभावना केली. भव्य जीवावर त्याचा योग्य परिणाम झाला. पण अभव्य तसेच राहिले. आर्थिक परिस्थितीतही अनेक उलाढाली होत आल्या. अनेक दुर्भिक्षे येऊन गेली, असंख्य जीव मेले व पुन्हा जन्मले. कित्येक देश उजाड झाले व नवे वसले, पण सर्व घडामोडींचें (३०)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy