SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 55
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीर पूर्वकाल ठराविक सिद्धांतांना धरूनच होणार. हे सिद्धान्त जाणण्यासाठीच चरि वाचा - वयाची व हे सिद्धान्त जाणले म्हणजे आपण ज्याला हल्ली इतिहास म्हणतों त्याची चिकित्सा करण्याची जरूरीच रहात नाहीं. हा सिद्धान्त आपलें पूर्वज जाणत होते म्हणूनच त्यांनीं तत्त्वाशीं गांठ घातली व किरकोळ तपशील सोडून दिला. पूर्वीच्या ग्रंथकर्त्यांनीं आपलें नांवमुद्रां क्वचितच दिले आहे. मग बाकीचा इतिहास देण्याचे दूरच राहिलें. बालजीवांनी विविक्षित तपशीलवार माहिती मागितल्यावर तीहि ठराविक साचाची देऊन त्यांनी मुख्य रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. जैनशास्त्रांतील तीं पूर्व भवांची वर्णनें, तीं ठराविक ठशाची चरित्रे, ती विचित्र अंकाची गणना व इतर अनिश्चित मांडणी जी आहे ती या अनंत कालाच्या अनिश्चित व अफाट घडामोडीमुळेच आहे. पण त्यांतून काढलेले सिद्धान्त मात्र अगदी अपरिवर्तनीय आहेत. तात्पर्य हैं कीं, वीरपूर्वकालाविषयीं जी वर माहिती दिली आहे त्यांत कांहीं अंशी असलेली साम्यता व अनिश्चितता पाहून ती माहितीच कित्येक वाचकांना खोटी वाटेल. पण वर दिलेल्या कारणासाठी त्यांनी तसें मानण्याचं धाडस करूं नये हें बरें. अनंतकालाचा इतिहास हा असाच असावयाचा. लहानशा प्रमाणांत पाहिले म्हणजे दिसणारी विविधता तोच विषय मोठया प्रमाणांत पाहिल्यावर लुप्त होते असा अनुभव आहेच. अनंतकालाच्या इतिहासांतहि असेच घडावयाचें. सिद्धान्त मात्र सारखाच आहे व त्याच्याशीच आपले काम आहे. म्हणून मागील इतिहास कोणी खोटा मानला तरी एकवेळ पत्करेल. पण त्यांतून काढलेले सिद्धान्त मात्र त्यांनी नाकारू नयेत. घरोघरी मातीच्याच चुली किंवा कोहि गेलें तरी पळसाला पाने तीनच म्हणतात त्याप्रमाणे कोणत्याहि कालाच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय वगैरे परिस्थितीचा विचार केला तरी मूल अवस्था व तिचे अनंत पर्याय सारखेच असावयाचे. बदल दिसला तरी तोहि नियमसिद्धच. अनंतकालचक्रांतील कोटाकोटी सागरोपम वर्षाच्या वाटेल त्या आल्याचा इतिहास पाहिला तरी निर्णय एकच. प्रत्येक काळांत मिध्यात्व मातले व प्रत्येक कालांत त्याचे निरसनही झालें. प्रत्येक कालांत बरेच लोक मोक्षाला गेले व प्रत्येक काळांत अगणित जीव भवचक्रांत भ्रमण करीतहि राहिले. पापाचा भार व्हावयाचा हा जसा नियम तसाच पुण्योदय व्हावयाचा हाहि नियम. मग अमुक ठराविक काली अमुक जीव पापबन्ध करीत असतील व अमुक जवि पुण्यबन्ध करीत असतील व अमुक जीव सर्व (२९)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy