SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 46
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ जैनधर्माचें प्राचीनत्व व चक्षुष्कांता, मरूदेव व श्रीकांता, आणि नाभि व मरूदेवी ह्रीं सात जोडपीं किंवा कुलकर जैनशास्त्रांत प्राचीन म्हणून नमूद आहेत. कालचक्रांतील उत्स1 पिंणी व अवसर्पिणी हे काळ प्रत्येकी दहा कोडाकोडी सागरोपम वर्षांचे असतात. उत्सर्पिणी कालांतील तिसन्या आन्याची ८४००००३ वर्षे साडे आठ महिनें बाकी असतां नाभि व मरूदेवीचे पोटी प्रथम तीर्थंकर ऋषभ देवांचा जन्म झाला. त्याना सुनंदा व यशस्मती अशा दोन स्त्रिया होत्या. पहिलीचे पोटी बाहुबली जन्मास आले व दुसरीचे पोटीं भरतचक्रवर्ती. या भरतचक्रवर्तीचे नांवावरून हिमालयाचे दक्षिणेकडील प्रदेशास भरतखंड असे नामाभिधान प्राप्त झाले. भारतवर्षातील हेच पहिले चक्रवर्ती होत. बाहुबली व भरत चक्रवर्ती यांच्यामध्यें बरींच युद्धे झाली. शेवटीं बाहुबलीनां वैराग्य प्राप्त होऊन ते दक्षित म्हैसूर संस्थानांतील श्रमणपुरस्सराजवळील टेकडीवर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. तेथून ते केवलज्ञान झाल्यावर अनेक देशांत विहार करीत करीत कैलास पर्वतावर आदिभगवंताच्या समवसरणांत गेले व पुढें मोक्षास गेले. मोक्षास कोठें गेले याबद्दल कोठेच उल्लेख नाहीं. पण बहुतेक ते कैलासावर गेले असावेत असें आम्हास वाटतें. त्यांचे स्मारक म्हणून श्रवण बेळगूळ येथें साठ फूट उंचीची नग्न प्रतिमा डोंगरावर खोदलेली आहे. ती असंख्य वर्षे ऊन, वारा व पाऊस खात असूनहि नूतनवत् आहे. असो. ऋषभदेवांनीच मानवासाठी धर्ममार्ग घालून दिला अशी कल्पना आहे. त्यानीं चातुर्वर्ण्य स्थापले व असि, मसि, कृषि व वाणिज्य वगैरे उपजीविकेची साधनें निर्माण करून दिली. भरताची भागवतांत बावीस अवतारांमध्ये गणना केली आहे व त्यांच्या तपश्वर्येचें वर्णन विकृत स्वरूपांत दिलेले आहे. भागवतांत जीं राजांचीं नांवें दिल्ली आहेत, त्यांच्या कालनिर्णयाचा विचार करतां कशास कांहीं मेळ नाहीं असें इतिहाससंशोधकांना दिसून आले आहे. तेव्हां भागवतावरून कांही त्यांचा कालनिर्णय बरोबर करतां येणार नाहीं. भागवतावरून एवढेच मात्र म्हणता येईल की, भागवतकारांना जैनपद्धतीचा कठोर तपश्चर्येच मार्ग पसंत नव्हता. त्यांना इंद्रियांचीं मुखें भोगत भोगतच तीं ईश्वरार्पण करून किंवा निर्हेतुपूर्वक भोगून वैकुंठ गांठावयाचे होतें. असे असले तरी जड भरताच्या मार्गाला पूज्य गणणे त्यांनाहि भाग पडले. कारण त्यालाहि त्यानीं विष्णूचाच अवतार ठरविलें आहे. असो. भरतचक्रवर्तीनीहि शेवटीं दीक्षा घेऊन कैलासपर्वतावर तपश्चर्या( १७ ) २
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy