SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 45
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र सर वाल्टर रैले वगैरे पाश्चिमात्य विद्वानांचेहि असेच मत आहे. मिश्र देशांतील शिलालेखावरून तेथील लोक प्रथम हिंदुस्थानचे रहिवासी असले पाहिजेत असें दिसून येतें. डॉ. अलेक्झांडर डेलमारनी सिद्ध केलें आहे कीं, कोलंबसने अमेरिका शोधून काढण्याचे पूर्वी भारतवासियांचे अमेरिकेशीं चांगलें दळणवळण होतें. मि. कौंट जॉर्स यांनीहि असें सिद्ध केलें आहे कीं, भारतवर्षातील संस्कृतीची छाप इतर सर्व राष्ट्रातील लोकावर पडलेली आहे. एकंदरीत आजकालच्या इतिहासावरूनहि ही गोष्ट सिद्ध होते कीं, भारतवर्षात मानवजाति फार प्राचीनकाळापासून नांदत आहे. आज जो कांहीं इतिहास प्रत्यक्ष साधनांनी उपलब्ध होत आहे त्यांत भारतीय संस्कृतीचंच प्राचीनत्व दिसून येतें. काल जसा अनादि व अनंत आहे आणि चेतन, जड वगैरे मूलतत्वेंहि अनावनंत आहेत तसाच धर्महि अनादि व अनंतच आहे. कालचक्र बारा आयांचे असून ते सतत फिरत असतें. कांहीं आयांतून धर्माची प्रभावना होत असते व कांहींतून धर्माला ग्लानि येत असली तरी धर्म हा नेहमीच असतो. तथापि अलीकडील पद्धतीनुसार प्रत्यक्ष साधनावरूनहि जैनधर्माचे प्राचिनत्व सिद्ध होतें. येशू ख्रिस्ताने ख्रिश्चनधर्म, महंमदानें मुसलमानीधर्म व बुद्धानें बौद्धधर्म जसा स्थापन केला तसा कांहीं जैनधर्म महावीरस्वामींनी स्थापन केलेला नाहीं. वीरशैव धर्म जसा पंचाचार्यांनी स्थापन केला व नंतर अनेक प्रमथांनी त्याचा पुनरुद्धार केला तसा ऋषभादि चोवीस तीर्थकरांनी जैनधर्माचा पुनरुद्धार केला एवढेच. वैदिकधर्मात निरनिराळ्या वेळी अनेक पंथ झालेले आहेत, पण सर्वाचा आधार वेदग्रंथच मानला जातो. तसा जैनधर्माचा एक ग्रंथ सांगतां येणार नाहीं. पण जैनधर्माची अविच्छिन्न परंपरा दाखवितां येईल. तीर्थकरांचें अजब वर्णन असले तरी त्यांचे अस्तित्व नाकारण्याचे जसे कारण नाहीं तसेंच या वेदप्रथांतूनहि तीर्थकरांची नांवें मिळत असल्यामुळे हें तीर्थंकर झालेच नाहींत असें म्हणतां येणार नाहीं. चोवीस तीर्थकर प्रत्येक कालांत होत आले आहेत. पण सर्वात प्राचीन उपलब्त्र ग्रंथ जे वेद त्यांमध्येंहि तर्थिंकर स्तुति मिळाल्यावर जैनधर्माचे प्राचीनत्व अलीकडील मार्गानीहि सिद्ध झालेच असें म्हणावयास हरकत नाहीं. फार प्राचीनकाळी म्हणजे भोगभूमीत युगलोत्पत्तीच होती. श्रम न करताच उपजीविका होई, त्यामुळे पापकर्मे फारशी घडतच नसत. विमलवाहन व चंद्रयशा, चक्षुष्मान व चंद्रकांता, यशस्वान् व सुरूपा, अभिचंद्र व प्रतिरूपा, प्रश्श्रोणि ( १६ )
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy