SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 18
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र मतांचे प्राचीनत्व इतिहासाने आज सिद्ध झालेलेच आहे. म्हणून या आर्येतरसंस्कृर्ताचे काही पुरावे जैनधर्मात सांपडतात की काय हे पहावयास पाहिजे. कर्मतत्व हे जैनांचे एक वैशिष्टय आहे हें वर सांगितले आहे. आमच्या अल्पमतीप्रमाणे आम्हांला असे वाटते की, वैदिक व बौद्धधर्मात जी कर्माची कल्पना आहे ती जनकर्मकल्पनेहुन निराळी आहे. जैनधर्माप्रमाणे कर्म हे पुद्गल परमाणु असून त्याचा जीवाबरोबर संबंध आल्याकारणाने जीव संसारांत फिरतो आणि हे कर्म परमाणुजीवाने दूर केल्याबरोबर त्याला निर्वाणपद प्राप्त होतें. जनधर्मात कर्माचे इतकें बारीक सारीक तपशेल दिलेले आहेत की ते एक स्वतंत्र शास्त्रच आहे व तें उपलब्ध पुराव्यावरून निदान महावीरतीर्थकराच्या वेळेपासून जनतत्वज्ञानांत अस्तित्वात असावे असे वाटते. ते जनांनी दुसऱ्याकडून उसने घेतले आहे असे वाटत नाही. कदाचित् है कर्मतत्वज्ञान आयेंतर संस्कृतीचं वैशिष्ट्यच असावे व त्याची पडछाया वैदिक दर्शनांत उपनिषदकालापासून पडावयास सुरवात झाली असावी. तसेच अहिंसातत्त्वाची छाप वैदिक धर्मावर किती पडली आहे हे आज सर्वाना विदितच आहे. परंतु ज्यावेळी पाश्चात्य विद्वान लोकांना भारतीयधर्माचा अभ्यास सुरू केला त्यावेळी जनांच्या दुराग्रहामुळे जैनधर्मग्रंथ जनेतरांना वाचावयास मिळाले नाहींत. म्हणून प्रारंभी कित्येक विद्वानांनी जैनधर्म हा बौद्धधमाची शाखा आहे असे समजून त्याप्रमाणे प्रतिपादन केले. नंतर थोडथोडे त्यांचे ग्रंथ पाहिल्यावर जैनधर्म हा बौद्धधमाच्या पूर्वीचा आहे व त्याचा संस्थापक महावीराऐवजी पूर्वी कोणीतरी झालेला असावा. कदाचित् तो पार्श्वनाथ असावा असे ते मानं लागले व म्हणूही लागले. बहुतेक इतिहासज्ञांचे मत असे आहे की, जनधर्म ही एक हिंदुधर्माची बंडखोर कन्या आहे. पण ती कल्पनाहि कल्पनाच असून त्या मताला प्रबल पुरावाच नाही. __उपरिनिर्दिष्ट आयेत्तर लोकांच्या संस्कृर्तीचे दृष्टीने जैनधर्माकडे पाहिल्यास जनधर्म हा एक स्वतंत्र धर्म असून फारच प्राचीनकालापासून गंगानदीच्या सुपीक प्रदेशांत त्याचा पुकळ तीर्थकरांकडून (जैनधीत या कालांत २४ तीर्थकर मानले आहेत ) उपदेश केला गेला होता असे मानणे भाग पडते. जैनधापत्लि कर्मतत्व, पुनर्जन्मतत्व, विश्वरचना व उत्पत्ति, संन्यासधर्म, अहिंसादि आचार, देवाची कल्पना इत्यादि तत्वे इतकी स्वतंत्र आहेत की, तो (१२)
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy